नाशिक – नवउद्यम अंतर्गत देशाच्या विकासात महाराष्ट्र काय योगदान देऊ शकेल, याचे उत्तर येथील हनुमान नगरात भरलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवातील युवा एक्स्पो विभागात सापडते. राज्यातील युवकांनी कृषी, संरक्षण, वाहन, इलेक्ट्रिकसह वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित नवे प्रकल्प मांडले आहेत. विशेष म्हणजे, देशपातळीवर तृणधान्य वर्ष साजरे होत असताना बहुतांश प्रकल्प तृणधान्य खाद्यपदार्थांवर आधारित आहेत.

शहरात आयोजित २७ व्या राष्ट्रीय महोत्सवात देशातील सात हजारांहून अधिक युवक-युवतींनी सहभाग घेतला आहे. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी वक्तृत्व, निबंध, गायन, नृत्य अशा विविध स्पर्धा होत आहेत. हनुमान नगरातील महोत्सवाच्या केंद्रात महाराष्ट्र देशाला काय देऊ शकेल, या अनुषंगाने महा एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी राज्यातील दहापेक्षा अधिक युवकांच्या गटांनी वेगवेगळ्या संकल्पनांवर काम केले आहे.

nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Kashmir youth employment, Pune organisation,
काश्मीर खोऱ्यातील तरुणही आता रोजगाराभिमुख, पुण्यातील संस्थांचा लष्काराच्या मदतीने पुढाकार
Jharkhand campaign trail
आश्वासनं देण्याची चढाओढ, झारखंडमझ्ये भाजपा-इंडिया आघाडीत वेगळीच स्पर्धा!
The first college in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय आहे पुण्यात! २०० वर्षे जुने हे कॉलेज माहितेय का?
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान

हेही वाचा – महोत्सवातून भाजपची युवा मतदारांना साद

हेही वाचा – खाद्य महोत्सवास नाशिककरांचा प्रतिसाद; राष्ट्रीय युवा महोत्सव

सातपूर येथील आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी गिर्यारोहकाचा अपघात झाल्यास तो कुठे आहे, किंवा त्याचा मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह कुठे आहे, हे शोधण्यासाठी उपयुक्त असे यंत्र तयार केले आहे. पावसाळ्यात विद्युत खांबांमधून विद्युत प्रवाह उतरतो. बऱ्याचदा यामुळे अपघात होतो. हे टाळण्यासाठी असे खांब कसे लक्षात येतील, हे शोधणारे यंत्रही याठिकाणी आहे. काहींनी कागदापासून तयार केलेल्या गणपती मूर्ती आहेत. याशिवाय तृणधान्यावर आधारीत बिस्कीट, चिक्की, लाडु, रवा, डोसा, इडली, पीठ यासह विविध खाद्यपदार्थ आहेत. ड्रोन, इलेक्ट्रिक बाईक, भ्रमणध्वनी अॅप यासह वेगवेगळे प्रकल्प तयार केले आहेत.