ज्ञानवापी मशिदीनंतर आता हनुमान जन्मस्थळाचा नवा वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या महतांनी हनुमानचा जन्म अंजेरीत झाला असल्याचा दावा केला होता. तर हनुमानाचा जन्म अंजेरीत नसून किष्किंधामध्ये झाला असल्याचा दावा महंद गोविंद दास यांनी केला आहे. एवढंच नव्हे एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार गोविंद दास यांनी नाशिकच्या महंतांना हनुमानाची जन्मभूमी सिद्ध करण्याचे आवाहन दिले आहे.
हनुमानाच जन्म किष्किंधामध्ये झाला असल्याचा दावा
नाशिकच्या अंजेरीत हनुमानाचा जन्म झाला असल्याचे मानले जाते. याठिकाणी हनुमानाचे मंदिर आहे. अंजनीपुत्र हनुमानाचा जन्म याच ठिकाणी झाला असल्याचा युक्तिवाद नाशिकच्या महंतांनी केला होता. मात्र, हे खोटे असून हनुमानाचा जन्म कर्नाटकमधील किष्किंधामध्ये झाला असल्याचा दावा किष्किंधाचे महंत गोविंद दास यांनी केला आहे.
कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये वाद
काही दिवसांपूर्वी हनुमानाच्या जन्मभूमीवरून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये वाद निर्माण झाला होता. दोन्ही राज्यांनी हनुमानाचा जन्म आपल्या राज्यात झाला असल्याचा दावा केला होता. कर्नाटकमधील हंपीजवळील अंजनेरी पर्वतावर हनुमानाच जन्म झाला असल्याचे कर्नाटकातील महंताचे म्हणणे आहे, तर तिरुमाच्या सात टेकड्यामधील म्हणजे अंजनाद्रीमध्ये हनुमानाचा जन्म झाला असल्याचे आंध्रातील महंतांचे म्हणणे आहे.