नाशिक – शहरातील नाशिक पूर्व मतदारसंघ पैसे वाटप, हाणामारी अशा घटनांमुळे वादग्रस्त ठरला असून सोमवारी रात्री या मतदार संघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या समर्थकांमध्ये पैसे वाटपाचे आरोप होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचले. पंचवटी पोलिसांनी या प्रकरणात सहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. नाशिक पूर्व मतदार संघात मविआकडून राष्ट्रवादीचे (शरद पवार) गणेश गिते आणि महायुतीकडून भाजपचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले यांच्यात लढत होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निवडणूक प्रचाराला सुरुवात झाल्यापासून तर प्रचार बंद झाल्यानंतरही या मतदार संघात वाद सुरु आहेत. मागील आठवड्यात शरद पवार गटाचे उमेदवार गिते यांच्या भावावर मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत ढिकले यांच्या समर्थकांनी वाद घातला होता. त्यावेळी गिते यांच्या भावाची गाडी फोडण्यात आली होती. सोमवारी रात्री पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती झाली. पंचवटीतील काट्या मारूती चौक परिसरात गिते समर्थक मतदार चिठ्ठी वाटप करण्याच्या माध्यमातून पैसे वाटप करत असल्याची माहिती ढिकले यांच्या कार्यकर्त्यांना मिळाली.

हेही वाचा >>> नाशिक : सप्तश्रृंग गड, कसारा, पिंपळगाव मार्गावर आजपासून ई बससेवेच्या अधिक फेऱ्या

ज्येष्ठ नगरसेवकाच्या घरी पैसे वाटप होत असल्याचे समजल्यानंतर ढिकले समर्थक त्याठिकाणी दाखल झाले. दोन्ही गट एकमेकांशी भिडले. दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कार्यकर्त्यांनी दोन चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार करावा लागला. पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काट्या मारूती चौक येथील हत्ती पूल परिसरातून दोन्ही गटाच्या सहा जणांना ताब्यात घेतले. यामध्ये निखील मिश्रा, प्रथमेश श्रीवास्तव, लक्ष्मण साबळे, नीलेश गोतरणे, अविनाश चौरे, अंकुश भुजड यांचा समावेश आहे.