लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाशिक: नाशिकचा अष्टपैलु रणजीपटू सत्यजित बच्छाव, १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाची कर्णधार ईश्वरी सावकार आणि उदयोन्मुख युवा खेळाडू साहिल पारख यांना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे २०२२ वर्षासाठीचे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

सत्यजितची यावर्षीही महाराष्ट्र संघात सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी निवड झाली आहे. २०१८-१९ यावर्षी या स्पर्धेत सत्यजितने सर्वाधिक गडी बाद करुन महाराष्ट्राला अंतिम फेरीत पोहचविण्यात मोठा हातभार लावला होता. २०२२ च्या हंगामात मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या काही सामन्यांत सत्यजितने महाराष्ट्राचे कर्णधारपद देखील भूषवले होते. २०२२-२३ च्या हंगामात सत्यजितच्या अष्टपैलु खेळामुळे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या स्पर्धेत नाशिकने विजेतेपद पटकावले होते.

आणखी वाचा-धुळ्यात पोलीस वाहनावर दगडफेक, दोन जण ताब्यात

ईश्वरी सावकारची मागील हंगामात १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली होती. ईश्वरीची चॅलेंजर चषकासाठी महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात, त्यानंतर १९ वर्षांखालील चॅलेंजर स्पर्धेसाठी इंडिया ए संघाच्या उपकर्णधारपदी, त्यापाठोपाठ श्रीलंका आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या चौरंगी मालिकेसाठी इंडिया बी संघात निवड झाली होती.

साहिल पारखची १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघात २०२३ -२४ च्या विनू मंकड करंडक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. साहिल डावखुरा सलामीवीर असून त्याची याआधी १६ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमीच्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी निवड झाली होती. साहिलची १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघातही निवड झाली होती.