नाशिक – नाशिक – मुंबई महामार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून नाशिकजवळील २० किलोमीटर रस्त्यापासून त्याची सुरुवात होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नाशिक – मुंबई महामार्ग उखडणे, खड्डे पडणे हे वारंवार होत असल्याने उपाययोजनांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम ( उपक्रम) मंत्री दादा भुसे, देवयानी फरांदे, दिलीप बनकर, नितीन पवार या आमदारांसह अधिकारी उपस्थित होते.

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

हेही वाचा >>> संप मागे… नाशिकमध्ये प्रशासनाची शिष्टाई यशस्वी, इंधन वितरणाला बंदोबस्तात सुरुवात

यावेळी आमदार फरांदे यांनी, उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना महामार्गाने मुंबईचा प्रवास त्रासदायक झाला असल्याचे सांगितले. नाशिकहून मुंबई गाठण्यासाठी सहा ते सात तासाचा कालावधी लागतो. गोंदे ते पिंपळगाव दरम्यान महामार्ग सहापदरी असून गोंदे ते वडपे दरम्यान महामार्ग चारच पदरी असल्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक खोळंबा होऊन राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होते. गोंदे ते वडपे दरम्यानही महामार्ग सहापदरी करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात होणारी दुरावस्था लक्षात घेऊन संपूर्ण महामार्गाचे कॉंक्रिटीकरण करण्याची मागणी त्यांनी केली. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी लक्ष दिल्यानंतर रस्त्याच्या कामांना वेग आला असून पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण होणे गरजेचे असल्याचे नमूद केले.

हेही वाचा >>> आश्रमशाळेतील सहा विद्यार्थिनींना अन्नातून विबाधा

राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे क्षेत्रिय व्यवस्थापक श्रीवास्तव यांनी नाशिक – मुंबई महामार्गाचे काँक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव असून नाशिक महानगरपालिका क्षेत्रालगत २० किलोमीटर रस्त्याचे विस्तारीकरण आणि काँक्रिटीकरण प्रस्तावित असल्याचे सांगितले. त्यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही दिली. पिंपळगाव ते वडपे दरम्यान टोल कालावधीस दोन वर्षे बाकी असून या रस्त्याची देखभाल, दुरुस्ती ठेकेदाराकडे आहे. त्यांच्याकडून लवकरच या रस्त्याचे नूतनीकरण करून घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

नाशिक ते मुंबई महामार्ग दरम्यान ठाणे ते वडपे हा भाग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) असून या रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. ज्या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होते, अशा ठिकाणी भुयारी मार्ग, उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू असून उर्वरित रस्ता आठपदरी केला जात आहे. सदर काम चार महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश दादा भुसे यांनी दिले.