Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates जळगाव : लोकसभेच्या जिल्ह्यातील जळगाव व रावेर या मतदारसंघांसाठी मंगळवारी (४ जून) सकाळी आठपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. तत्पूर्वी, मतयंत्र ठेवलेला कक्ष सकाळी सातला उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमोर उघडण्यात आला. शहरातील एमआयडीसी भागातील वखार महामंडळाच्या शासकीय धान्य गोदामात मंगळवारी (४ जून) सकाळी आठपासून मतमोजणीस प्रारंभ झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याप्रसंगी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित आदी उपस्थित होते.

हेही वाचा…नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या जागेवर भाजपचे अतिक्रमण ? भाजपचे डॉ. राजेंद्र विखे यांचा अर्ज दाखल

लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात १४ व रावेर मतदारसंघात २९ उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी (४ जून) मतदानयंत्रातून उघडत आहे. पहिल्या टप्प्यात टपाली मतदान करण्यात आले. जळगाव मतदारसंघात ५४७९, तर रावेरमध्ये २७८९ टपाली मतदान करण्यात आले. दोन्ही मतदारसंघांचा निकाल दुपारी चारपर्यंत हाती येईल, असे अपेक्षित आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्या समर्थकांमध्ये धाकधूक वाढली आहे.