जळगाव : लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पाटील- पवार व रावेर मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील हे आघाडीवर आहेत.
लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी पती दिवंगत उदय वाघ यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर त्यांनी चिमुकले श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. आपल्याला जनतेचा कौल मिळणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्रभू श्रीरामचंद्रांनी आशीर्वाद भाजपच्या उमेदवारांना दिला आहे.
आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढलो. नरेंद्र मोदींना तिसर्यांदा पंतप्रधान होतील. आम्ही जो चारशेपारचा नारा दिला आहे, तो आम्ही पार निश्चित करू, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर स्मिता वाघ या मतमोजणीस्थळाकडे रवाना झाल्या. रावेर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी जनता ही आता महाविकास आघाडीच्या विजयाचा गुलाल उधळेल. ही निवडणूक आम्हीच जिंकू, असे सांगितले.