महाराष्ट्र रेल्वे बोर्डाने एक अनोखी शक्कल लढवली आहे. रेल्वे बोर्डाने नाशिकमधील जुन्या रेल्वे डब्यांचं रेस्टॉरंटमध्ये रूपांतर केलं आहे. या ऑफ ट्रॅक रेल्वे रेस्टॉरंटचे व्हिडीओ समोर आले असून सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी आणि महसूल वाढवण्याच्या हेतूने रेल्वे बोर्डानं हा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रेल्वे डब्यातील हे अनोखं हॉटेल लोकांना खूप आकर्षित करत आहे. हे रेस्टॉरंट बाहेरून आणि आतून खूप सुंदर बनवलं आहे. या अनोख्या हॉटेलचं सौंदर्य ग्राहकांना आकर्षित करत आहे. तसेच येथील जेवणही दर्जेदार असल्याचं एका ग्राहकाने सांगितलं. आपण या हॉटेलला ‘पॅलेस ऑफ फूड ऑन व्हील्स’ असं म्हणू शकतो, असंही त्याने ‘एएनआयला’ सांगितलं.

‘एएनआय’ वृत्तसंस्थेनं आपल्या ट्विटर खात्यावर या हॉटेलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या ५० सेकंदांच्या व्हिडीओमध्ये संबंधित हॉटेलची अप्रतिम सजावट दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.