नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा, या मागणीसाठी सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा…आरोग्य विद्यापीठातील संजीवनी विद्यार्थी सुरक्षा योजनेच्या नियमावलीत बदल

उपोषणाच्या माध्यमातून आंदोलकर्त्या कर्मचाऱ्यांनी अडचणींचा पाढा वाचत सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार वेतनश्रेणी लागू करावी, आंदोलन काळातील २७ ऑक्टोबर २०२१ ते २२ एप्रिल २०२२ हा आंदोलन कालावधी विशेष बाब म्हणून वार्षिक वेतनवाढ उपदानासाठी ग्राह्य धरण्यात यावा, २०१७ मधील आगार बदलीचे परिपत्रक रद्द करून शिस्त व आवेदन कार्य पध्दतीमधील जाचक अटी रद्द कराव्यात, रोख रक्कमविरहित वैद्यकीय योजना लागू करण्यात यावी, एप्रिल २०१६ पासून वार्षिक वेतनवाढ, महागाई भत्ता आणि घरभाडे याचा फरक मिळावा, विधान भवनात मान्य केलेल्या १६ मागण्यांची अंमलबजावणी करण्यात यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.