नाशिक : तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात नवीन मिळकती व कर सुधारणेच्या नावाने निवासी, वाणिज्य व उद्योग क्षेत्रात करण्यात आलेल्या अन्यायकारक करवाढीची पुन्हा नव्याने पडताळणी करावी आणि न्यायोचित फेरबदल करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने महानगरपालिकेला दिले आहेत. अन्यायकारक दरवाढ रद्द करण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता.

तत्कालीन आयुक्त मुंढे यानी मार्च २०१८ मधील आदेशान्वये एक एप्रिल २०१८ अन्वये अस्तित्वात येणाऱ्या नवीन मिळकती, तसेच कर सुधारणेखाली शहरातील इंच, इंच जमिनीवर मालमत्ता कर आकारणीचा निर्णय घेतला होती. जुन्या मिळकतींना निवासी क्षेत्रात ३३ टक्के, वाणिज्यमध्ये ६४ टक्के तर उद्योगांना ८२ टक्के करवाढ लागू केली होती या दरवाढीने नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली होती.

New Home Investment, Tax Exemption,
करावे कर समाधान : नवीन घरातील गुंतवणूक आणि कर सवलत
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
fees Increase in military schools in maharashtra in after twenty years
राज्यातील सैनिकी शाळांच्या शुल्कात वीस वर्षांनी वाढ; ‘एनडीए’तील मराठी मुलांचा टक्का वाढविण्यासाठी धोरणात सुधारणा
GST tax evasion of Rs five to eight thousand crore through fake documents Main facilitator arrested from Gujarat
बनावट कागदपत्रांद्वारे पाच ते आठ हजार कोटी रुपयांची जीएसटी कर चुकवेगिरी; गुजरातमधून मुख्य सूत्रधार अटकेत
Deputation in MPSC by circumventing the rules
नियम डावलून ‘एमपीएससी’मध्ये प्रतिनियुक्ती? माहिती अधिकार अर्जाला काय दिले उत्तर?
Thane Municipal Employees, Diwali, Thane Municipal Employees Salary, Thane,
ठाणे पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सानुग्रह अनुदानापाठोपाठ वेतन दिवळीआधी जमा होणार
Nashik Central, Nashik West, Thackeray group, Dr. Hemlata Patil
नाशिक मध्य, नाशिक पश्चिम अखेर ठाकरे गटाकडे; डॉ. हेमलता पाटील बंडखोरीच्या तयारीत
readers feedback on loksatta editorial
लोकमानस :  प्रक्रिया धुडकावून अधिसूचना

हेही वाचा…नाशिक शहरातील दोन मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा

अन्यायकारक घरपट्टी आकारणीला लोकप्रतिनिधी व नागरिकांनी विरोध केला होता. त्याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले होते. त्यात करवाढीचे आदेश रद्द करण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मान्य करून ठराव मंजूर करण्यात आला. आयुक्तांनी हा ठराव विखंडनासाठी शासनाकडे सादर केला होता. मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे दाद मागण्यात आली आहे. याबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी ही दरवाढ रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. नगरविकास विभागाने मनपा आयुक्तांशी पत्र व्यवहार करून घरपट्टीचे पुनर्निरीक्षण करून न्यायोजित फेरबदल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे नागरिकांवरील वाढीव कराचा बोजा कमी होण्यास मदत होईल असे आमदार फरांदे यांनी म्हटले आहे.