नाशिक – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ओबीसींचे नेते तथा ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. परंतु, महिन्याचा कालावधी उलटूनही राज्यातील नेतृत्वाने त्यांची उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळेच भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली, असा सूर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत उमटला. भुजबळ यांनी निर्णय मागे घेऊन या जागेवर निवडणूक लढवावी, असा आग्रह धरण्यात आला. परंतु, भुजबळ यांनी माघारीच्या निर्णयात बदल होणार नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मंगळवारी आयोजित बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, शहराध्यक्ष कविता कर्डक आदी उपस्थित होते. ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी भुजबळांची दिल्लीत आवश्यकता आहे, त्यामुळे त्यांनी नाशिकच्या जागेवर उमेदवारी करावी, असा आग्रह सर्वांनी धरला. याबाबत भुजबळ जो निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य राहील, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार
Uddhav Thackeray-Sharad Pawar meeting,
उद्धव ठाकरे-शरद पवार यांची भेट, महाविकास आघाडीची लवकरच बैठक होणार
Chhagan Bhujbal On Ajit Pawar
Chhagan Bhujbal : अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कुणी रचलं? भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले, “शरद पवार अन् खर्गेंचा वाद…”
dr baba adhav warns agitation for mulshi dam victims
मुळशी धरणग्रस्तांसाठी पुन्हा कारागृहात जाऊ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव यांचा इशारा
Ajit Pawar
“जनमानसात खराब प्रतिमा असणाऱ्यांना पक्षात घ्यायचं नाही”, अजित पवारांचा रोख कोणाकडे? राष्ट्रवादीच्या शिबिरात म्हणाले…

हेही वाचा >>> भुजबळांचे विधान अन नाशिकमध्ये उमेदवारांच्या स्पर्धेत वाढ

देशभरात ओबीसी बांधवांसाठी काम करणाऱ्या भुजबळ यांची केंद्रीय नेतृत्वाने दखल घेतली. त्यांना निवडणूक लढण्यास आग्रह धरला ही समता परिषदेसाठी अभिमानाची बाब आहे. केंद्रीय नेतृत्वाने घेतलेली दखल लक्षात घेऊन आपण संयमी भूमिका ठेवावी. नाशिकचा विकास आणि ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी भुजबळ यांची दिल्लीत आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांचे नेतृत्व हे दिल्लीत असावे. याबाबत ते जो निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य असेल, असे मत खैरे आणि कर्डक यांनी व्यक्त केले. यावेळी विदर्भ ब्राम्हण विकास मंच नाशिकच्यावतीने सचिव रुपेश जोशी यांच्या शिष्टमंडळाने भुजबळ यांनी उमेदवारी केल्यास पाठिंबा जाहीर केला.

हेही वाचा >>> धुळे: गैरहजर कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक ताब्यात

भुजबळ माघारीवर ठाम

समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचे प्रेम मान्य आहे. आमचे ते सहकारी आहेत. त्यांची समजूत काढली जाईल. शेवटी राजकारणात अनेक घटक काम करतात. वेगवेगळे विषय, अडचणी पुढे येतात. आता माघारीचा निर्णय घेतला आहे, त्यात बदल होणे अशक्य असल्याचे भुजबळ यांनी सूचित केले. ऐनवेळी आग्रह झाला तरी आपण उभे राहणार नाही. महायुतीने लवकर निर्णय घेण्याची गरज आहे. विरोधी उमेदवारांनी महिनाभरात मतदारसंघात प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. महायुतीकडून जेवढा विलंब होईल, त्याचा प्रचारावर परिणाम होईल, असे त्यांनी नमूद केले.

Story img Loader