नाशिक – स्थानिक राजकारण आणि सत्ताकारणाची पुढील दिशा निश्चित करणाऱ्या जिल्ह्यातील १४ पैकी बहुतांश बाजार समित्यांमध्ये दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. माघारीच्या अखेरच्या दिवशी प्रतिस्पर्ध्याने माघार घ्यावी म्हणून सर्व पातळीवर प्रयत्न झाले. मनमाड समितीत शिंदे आणि ठाकरे गट परस्परांना भिडले. नाशिक बाजार समितीत परस्परांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे माजी सभापती देविदास पिंगळे आणि शिवाजी चुंभळे यांच्या पॅनलमध्ये सामना रंगणार आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील पक्ष आणि शिवसेना-भाजपचे पदाधिकारी असे पॅनल आकारास आले असून अनेक दिग्गज रिंगणात उतरले आहेत.

नाशिक, मालेगाव, मनमाड, येवला, नांदगाव, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सिन्नर, चांदवड, कळवण, दिंडोरी, घोटी, सुरगाणा व देवळा या बाजार समित्यांची निवडणूक होत आहे. छाननीत हरकती घेऊन विरोधकांचा पत्ता कापण्याचे प्रयत्न झाले. त्यानंतर माघारीची मुदत संपण्याआधी प्रतिस्पर्धाची समजूत काढण्याची धडपड झाली. त्यामुळे गुरूवारी मुदत संपुष्टात येण्यापूर्वी अनेक इच्छुकांनी माघार घेतल्याचे पहायला मिळाले. राज्यातील बदललेल्या समीकरणात पक्षांच्या नेत्यांनी ही निवडणूक गांभिर्याने घेतली आहे. नाशिक बाजार समितीत पुन्हा पिंगळे आणि चुंभळे या परंपरागत प्रतिस्पर्धांमध्ये लढत रंगणार आहे. रिंगणातील १३७ पैकी ९७ इच्छुकांनी माघार घेतली. त्यात मनपा स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांचाही समावेश आहे. आता १८ जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात आहेत. त्यात सहकारी संस्था मतदारसंघात २६, ग्रामपंचायत मतदारसंघात ११ आणि व्यापारी गटात दोन व हमाल-मापारी गटात एक उमेदवार आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत १८ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात आहेत. विद्यमान आमदार दिलीप बनकर आणि माजी आमदार अनिल कदम या महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या पॅनलमध्ये चुरशीची लढत होणार आहे.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Financial misappropriation case, acquittal ,
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाची दोषमुक्तीची मागणी फेटाळली
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Article about obcs dominate government job recruitment
लोकजागर : ओबीसींची ‘सर्वोच्च’ अडवणूक!
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
UGC, recruit professors, Instructions UGC,
आयोगामार्फत प्राध्यापक भरतीस नकार; प्रचलित नियमांनुसारच प्रक्रिया राबवण्याच्या ‘यूजीसी’च्या सूचना

सिन्नर बाजार समितीत १८ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे आमदार माणिक कोकाटे आणि विरोधी माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे यांच्या पॅनलमध्ये लढत होणार आहे. या ठिकाणी भाजप-मनसेचे अपूर्ण पॅनलही राहणार आहे. घोटी बाजार समितीच्या निवडणुकीत ११५ उमेदवारांनी माघार घेतल्याने रिंगणात ४४ उमेदवार असून या ठिकाणी तिरंगी लढत होणार असल्याने राजकारण तापणार आहे. नांदगाव बाजार समिती निवडणुकीत शेवटच्या दिवशी ७७ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने १८ जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात राहिले. ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ताधारी शिंदे गटाचे आ. सुहास कांदे यांच्या पॅनल विरोधात महाविकास आघाडीचे पॅनल आहे..महाविकास आघाडीच्या पॅनलचे नेतृत्व माजी आमदार पंकज भुजबळ आणि अनिल आहेर हे करीत आहेत.

मालेगावात शिंदे गट-महाविकास आघाडी पॅनलमध्ये लढत

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे गट विरुध्द महाविकास आघाडी यांच्यात लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित आघाडी या पक्षांच्या महाविकास आघाडीच्या पॅनलमधील सोसायटी व ग्रामपंचायत गटातील एकूण १५ उमेदवारांची घोषणा ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी केली. या प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते डाॅ. जयंत पवार, ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, पवन ठाकरे आदी उपस्थित होते. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच आघाडीतील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना पॅनलमध्ये योग्य प्रतिनिधित्व देण्यात आल्याचा दावा हिरे यांनी केला. व्यापारी व हमाल मापारी गटात उमेदवारी देणे मात्र हिरे यांनी टाळले आहे. महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये सोसायटी सर्वसाधारण गटात स्वत: अद्वय हिरे हे निवडणूक लढवित आहेत. तर शिंदे गटाच्या पॅनलमधील सर्व १८ जागांवरील उमेदवारांची घोषणा पालकमंत्री दादा भुसे यांनी केली. याप्रसंगी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजय दुसाने, तालुका प्रमुख मनोहर बच्छाव, विनोद वाघ आदी उपस्थित होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या पॅनलला समर्थन दिल्याचेही भुसे यांनी सांगितले.

Story img Loader