जळगाव: लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातील सहाच्या सहा जागांवर महायुतीचा विजय होईल. देशात तो विक्रम ठरेल, असा दावा भाजपचे नेते ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. जामनेर तालुक्यात वादळी वार्यासह पावसामुळे केळीबागांसह शेतीपिके, घरे, गोठ्यांचे मोठे नुकसान झाले. रविवारी नुकसानग्रस्त भागाची पाहणीवेळी ग्रामविकासमंत्री महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाहीही दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील जागांबाबत मंत्री महाजन यांनी सर्वच्या सर्व सहा जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. आता घोडामैदान समोर आहे. जळगाव लोकसभेच्या जागेबाबतच्या चर्चा निराधार आहेत. त्यामुळे आपण चार जूनला भेटू. जिल्ह्यातील लोकसभेच्या जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांना विक्रमी मताधिक्क्य मिळेल आणि महायुतीच्या सर्वांत जास्त जागा महाराष्ट्रातून निवडून येतील, असा दावाही मंत्री महाजन यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा