नाशिकमधील कळवण-वणी रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात पाच तरूणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. या अपघातात आणखी तीनजण जखमीदेखील झाले आहेत. हे सर्वजण एका मित्राच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून परतत होते. त्यावेळी कळवण-वणी रस्त्यावर त्यांची कार झाडावर आदळून हा अपघात घडला. अपघातात ठार झालेले सर्वजण वणी गावाचे रहिवाशी होते. त्यामुळे सध्या वणी गावावर शोककळा पसरली आहे.
वणी -कळवण महामार्गावरील एकनाथशेठ खांडे यांच्या मळ्यालगत रात्री २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. मृतांमध्ये साहील जावरे, साहील सय्यद, सचीन शेळके, सकलेन सय्यद, सचिन ढोले यांचा समावेश आहे. तर इमरान शेख, रोशन खान्दम, ज्ञानेश्वर धूम हे ३ मित्र जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा