Malegaon Central Assembly Election 2024 : महाराष्ट्राची निवडणूक पार पडली आहे. त्यानंतर एक्झिट पोल्समध्ये महायुतीकडे सत्ता जाईल असा अंदाज वर्तवला गेला होता. २३ तारखेच्या निकालात महाराष्ट्रात महायुतीचा विजय झाला आहे. मालेगाव (मध्य) विधानसभा मतदारसंघ – ११४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मालेगाव (मध्य) मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.८ ते २० आणि २६ ते ६५ यांचा समावेश होतो. मालेगाव (मध्य) हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे मुफती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक हे मालेगाव (मध्य) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान ( Malegaon Central ) आमदार आहेत. त्यांनाच पुन्हा तिकिट देण्यात आलं होतं त्यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा