नाशिक – प्रलंबित देयक मंजुरीसाठी दलाली म्हणून ३३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मालेगाव येथील आयुक्त कर विभागातील वरिष्ठ लिपीकास सचिन महाले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार बांधकाम ठेकेदार असून मालेगाव महानगरपालिका अंतर्गत गटार बांधकामाची निविदा तक्रारदाराने त्यांच्या भावाच्या नावे घेतली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुलींसाठी मोफत शिक्षण योजना केवळ नावाला – संस्थांकडून सर्रास शुल्क वसुली

काम पूर्ण केलेल्या नाला बांधकामाचे देयक मंजूर करावे म्हणून तक्रारदार मालेगाव महानगर पालिकेतील वरिष्ठ लिपीक सचिन महाले यास भेटले असता देयक मंजुरीसाठी स्वत:ला आणि इतरांना बक्षीस म्हणून चार टक्के प्रमाणात पैसे द्यावेत, असे सुचित केले. त्याप्रमाणे तक्रारदार देयक मंजूर झाल्यानंतर महालेच्या भेटीस गेले असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसमोर त्याने लाचेची मागणी केली. लाचेचे ३३ हजार रुपये स्वीकारतांना महाले यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्याच्यावर किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महालेच्या वर्धमान नगरातील घराची झडती घेतली असता १३ लाख १०, २०० रुपये रोख, सोन्याची तीन नाणी आणि एक सोन्याचा तुकडा असे १३३ ग्रॅम सोने आढळल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने देण्यात आली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malegaon municipal corporation clerk caught while accepting bribe zws
Show comments