Malegaon Outer Assembly Election 2024 : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आणि महाराष्ट्रात निवडणूक पार पडली. आता २३ तारखेला निकालानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघही महत्त्वाचा मानला जातो. २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मालेगाव (बाह्य) मतदारसंघात नाशिक जिल्ह्याच्या मालेगांव तालुक्यातील वडनेर, करंजगव्हाण, झोडगे, दाभाडी, सौंदाणे, मालेगांव ही महसूल मंडळे आणि मालेगाव महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ७, २१ ते २५ यांचा समावेश होतो. मालेगाव (बाह्य) हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो. या मतदारसंघावर दादा भुसेचं वर्चस्व आहे. २००४ मध्ये ते निवडून आले आणि आमदार झाले. त्यानंतर २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनीच या मतदारसंघातून विजय मिळवला. २०२४ ला या मतदारसंघाची निवडणूक ही दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे अशी असणार आहे. अद्वैय हिरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना दादा भुसेंच्या विरोधात महाविकास आघाडीने तिकिट दिलं आहे.

दादा भुसे यांचं राजकारण वेगळं

प्रवाहाविरुद्धचं राजकारण करणारा नेता, अशक्य ते शक्य करून दाखवणारा नेता अशी दादा भुसे यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे. मालेगावातील प्रस्थापितांना भुसे यांनी कायमचं घरी बसवलं. त्यामुळे त्यांची ही ओळख अधिकच गडद झाली.

Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
murbad assembly constituency shinde shiv sena vaman mhatre meet mlc milind narvekar
शिंदेंचा पाईक मिलिंद नार्वेकरांच्या भेटीला
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Prakash Govind Mhatre
कल्याण ग्रामीण शिंदे शिवसेनेचे प्रकाश म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून तीन जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी; कारवाईचं कारण काय?
uddhav thackeray sada sarvankar
Sada Sarvankar : “आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या…”, सदा सरवणकरांच्या ‘त्या’ पोस्टवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा

काँग्रेस आणि समाजवाद्यांमध्ये दादा भुसेंनी मिळवली खास ओळख

मालेगाव हा काँग्रेस आणि समाजवाद्यांचा गड म्हणून ओळखला जातो. काँग्रेस आणि समाजवाद्यांच्या वर्चस्ववादी राजकारणात कोणीही टिकून राहण्याची शक्यता नसताना आणि जिल्ह्यातील तरुणांचा कल या दोन्ही पक्षांकडे असतानाच भुसे यांनी मात्र शिवसेनेत काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन आपलं राजकारण सुरू केलं. त्यात त्यांना यशही आलं. सुरुवातीच्या काळात गावोगावी त्यांनी शिवसेनेच्या शाखा उभ्या केल्या. साधा शिवसैनिक ते तालुकाप्रमुख अशी मजलही त्यांनी मारली. भुसे हे सामान्य शेतकरी कुटुंबातून आले आहेत. घरात दुरून दुरूनही राजकीय वारसा नव्हता. तरीही त्यांनी आपल्या हिंमतीवर राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केलं.

मालेगावातील हिरे घराण्याच्या वर्चस्वाला भुसेंनी दिले हादरे

मालेगावात सहकारमहर्षी भाऊसाहेब हिरे यांचं वर्चस्व होतं. त्यांच्यानंतर त्यांच्या घरातील वारसांनी ही परंपरा कायम राखली. मालेगावमधील हिरे घराण्याच्या या वर्चस्वला भुसे यांनी हादरे दिले. गेली वीस वर्ष पक्षाचे काम करत असताना सुरुवातीला भुसे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. नंतर मात्र, त्यांनी या पराभवावर मात केली. २००४ मध्ये प्रस्थापित हिरे घराण्याचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर भुसे यांनी मागे वळून पाहिले नाही. मालेगाव बाह्य मतदारसंघात त्यांनी सलग चारवेळा दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते ग्रामविकास राज्यमंत्री होते, तर ठाकरे सरकारमध्ये त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. शेतकरी कुटुंबातून आलेल्या भुसेंना आता शिंदे आणि भाजपा सरकारमध्ये पुन्हा मंत्रिपद मिळालं आहे.

मागील तीन निवडणुकांची स्थिती काय?

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ हा धुळे लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे आणि महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यात आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे भुसे दादाजी दगडू १,२१,२५२ मते मिळवून विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे डॉ. तुषार रामकृष्ण शेवाळे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर: ४७,६८४ मतांचं होतं.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे भुसे दादाजी दगडू ८२,०९३ मते मिळवून विजयी झाले. भाजपा पक्षाचे ठाकरे पवन यशवंत यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर: ३७,४२१ मते. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाची पुढील निवडणूक या वर्षी होणार आहे.

२००९ दादा भुसे विजयी झाले. त्यांनी प्रशांत हिरे यांचा पराभव केला. त्या निवडणुकीत प्रशांत हिरेंना ६५ हजार ७३ मतं मिळाली होती. तर दादा भुसेंना ९५ हजार १३७ मतं मिळाली होती. २००९ पासून या मतदारसंघावर दादा भुसेंचं वर्चस्व आहे.