Malegaon Outer Assembly Election 2024 : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आणि महाराष्ट्रात निवडणूक पार पडली. २३ तारखेला लागलेल्या निकालात महायुतीने मैदान मारलं आहे. दादा भुसे यांनी गड राखला आहे. त्यांना एक लाखांहून अधिक मतं मिळाली आहेत. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघही महत्त्वाचा मानला जातो. २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मालेगाव (बाह्य) मतदारसंघात नाशिक जिल्ह्याच्या मालेगांव तालुक्यातील वडनेर, करंजगव्हाण, झोडगे, दाभाडी, सौंदाणे, मालेगांव ही महसूल मंडळे आणि मालेगाव महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ७, २१ ते २५ यांचा समावेश होतो. मालेगाव (बाह्य) हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो. या मतदारसंघावर दादा भुसेचं वर्चस्व आहे. २००४ मध्ये ते निवडून आले आणि आमदार झाले. त्यानंतर २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनीच या मतदारसंघातून विजय मिळवला. २०२४ ला या मतदारसंघाची निवडणूक ही दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे अशी असणार आहे. अद्वैय हिरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना दादा भुसेंच्या विरोधात महाविकास आघाडीने तिकिट दिलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा