मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकांत जालनाहून मुंबईकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या एका बोगीची कपलिंगची बेअरींग तुटल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने गाडी थांबविण्यात आली. दुरूस्तीनंतर तब्बल दोन तासांच्या विलंबाने ही गाडी मार्गस्थ झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नाशिक : महाआरोग्य शिबिरात साडेसात लाखापेक्षा अधिक रुग्ण तपासणी

गाडी क्रमांक १२०७२ जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस ही सकाळी ११.१० च्या सुमारास मनमाड रेल्वे स्थानकांत फलाट क्रमांक पाचवर येताच गाडीच्या एका बोगीची कपलिंगची बेअरींग तुटल्याचा प्रकार उघड झाला. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. गाडी मार्गस्थ झाल्यानंतर धावत्या प्रवासात अशी घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. पण बेअरींग तुटल्याचे लक्षात आल्यावर गाडी थांबविण्यात आली. रेल्वे अधिकारी, कर्मचार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. एव्हाना यातायात पथकही दाखल झाले. रेल्वे कर्मचार्यांनी तातडीने कपलिंग दुरूस्तीचे काम हाती घेतले. दोन तासापेक्षा जास्त वेळेत हे काम करण्यात आले. नंतर ही गाडी मुंबईकडे मार्गस्थ झाली. गाडीतील प्रवाशांना नाहक दोन तास ताटकळत थांबावे लागले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malfunction in janshatabdi express nashik dpj