लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून पतीने गळफास घेतल्याची घटना सुरगाणा तालुक्यातील श्रीभुवन येथे घडली. श्रीभुवन येथील मनोहर दळवी (५२) हे पत्नी जयवंताबाई (४७) यांच्या चारित्र्यावर संशय घेत असत. त्यांच्यात कायम वाद निर्माण होत होते. अखेर या वादाचे पर्यवसान हत्या आणि आत्महत्येत झाले.

आणखी वाचा-नाशिक: लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांची अवैध माया; अपसंपदेचा गुन्हा

शुक्रवारी रात्री स्वयंपाक घरात पती-पत्नींमध्ये खासगी कारणावरून वाद झाला. यावेळी मनोहरने जयवंताबाईच्या गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घातले. नंतर पळून गेलेल्या मनोहरने काही अंतरावर जाऊन गळफास घेतला. गंभीर जखमी जयवंताबाई यांना तातडीने सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. दोघांच्या पश्चात दोन मुलगे आणि दोन मुली आहेत. मुलगा लक्ष्मण दळवी (२०) याने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man committed suicide after murder his wife mrj