बहिणीकडे वाईट नजरेने पाहिले, म्हणून एकाने सुरक्षारक्षकाचा खून केला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. पंचवटीतील म्हसरूळ येथील वाढणे वसाहत परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षकासह इतर कामगार बांधकामाजवळच राहतात.
सुरक्षारक्षक आणि एका कामगारात वाद झाला. दारुच्या नशेतील संशयित कामागाराने आपल्या बहिणीकडे वाईट नजरेने पाहतो, असा आरोप करीत धारदार शस्त्राने सुरक्षारक्षक सतपाल प्रसाद (४०) याच्यावर वार केले. त्यात त्याचा खून झाला. म्हसरूळ पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होते.