लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नाशिक: शहराचे वैभव असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिरातील असुविधांमुळे नाट्य कलाकारांसह, निर्माते, प्रेक्षकांना होणाऱ्या गैरसोयीचे पाढे याआधीही अनेक दिग्गजांनी वाचले असताना तोच अनुभव अभिनेते वैभव मांगले यांना आल्यानंतर या प्रकरणाची दखल घेत महापालिका प्रशासनाने कलामंदिराचे व्यवस्थापक जे. के. कहाणे यांना निलंबित केले आहे.
महापालिकेच्या ताब्यात असलेल्या कलामंदिराचे करोनापूर्वी नुतनीकरण करण्यात आले. यासाठी नऊ कोटीहून अधिक रुपयांचा खर्च करण्यात आला. कोट्यवधींचा चुराडा होऊनही कलामंदिराला लागलेले असुविधांचे ग्रहण कायम आहे. स्वच्छता गृहांमध्ये गैरसोय, वातानुकूलित यंत्रणा बंद, उपहार गृह बंद, पंख्यांचीही व्यवस्था नाही. असुविधेच्या फेऱ्यात अडकलेल्या कलामंदिरात प्रायोगिक, व्यवसायिक नाटकांचे प्रयोग होत असतात. रविवारी संज्या-छाया नाटकाचा प्रयोग सुरू असतांना वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने कलाकारांसह प्रेक्षकांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. नाराज होवून काही प्रेक्षकांनी नाट्यमंदिरातून बाहेर पडत तिकीटाचे पैसेही परत घेतले.
आणखी वाचा- नाशिक: सिटीलिंक बसमधून उतरताना महिला जखमी
कलामंदिरातील गैरसोयींविषयी मांगले यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश प्रभारी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. सहायक आयुक्तांच्या चौकशीत प्राप्त अहवालानुसार कालिदास कलामंदिराचे व्यवस्थापक जे. के. कहाणे यांचे निलंबन करण्यात आले आहे.