मनमाड : रासायनिक खतांवरील अनावश्यक जोडखत देण्यावर बंदी करावी, अशी मागणी मनमाड कृषी वितरक संघटनेतर्फे करण्यात आली आहे. या बाबतचे निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी विभागासह आमदार सुहास कांदे, पालकमंत्री दादा भुसे आणि कृषिमंत्री धनंजय मुंढे आदींना पाठविले आहे. कंपन्या युरियासोबत अन्य खते माथी मारत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

रासायनिक खतांच्या कंपन्या आर.सी.एफ. इनफो जुआरी आणि इतर सर्व कंपन्या युरिया घेताना झिंक आणि इतर अनेक प्रकारचे अनावश्यक खत व उत्पादन वितरकास आवश्यकता नसताना घेण्यास भाग पाडतात. मुळात यंदा नांदगाव तालुक्यात पाऊस कमी आहे. हा तालुका नेहमी अवर्षणग्रस्त तालुका राहिला आहे. मुख्य पीक बाजरी, मका असून अर्ध्यापेक्षा कमी भागात बागायती क्षेत्र नाही. म्हणून युरिया खताला जास्त प्रमाणात मागणी आहे. पण युरियासोबत कंपन्यांनी कृषी वितरकांच्या माथी मारलेल्या रासायनिक खतांची शेतकऱ्यांकडून मागणी नसते. आमच्याकडून त्याची विक्री झाल्यास शेतकऱ्यांच्या नजरेस आम्ही दोषी आढळून येतो, त्यामुळे कृषी वितरकांना अपमानास्पद वागणूक दिल्याचे प्रकार घडत आहे. याबाबत जोडखत देणाऱ्या कंपनीला दोषी धरले जात नाही. तसेच मागणीनुसार खते उपलब्ध करून दिली जात नाही. युरिया खताची मागणी केल्यास रासायनिक खत, वॉटर सोलूबल, नॅनो युरिया ही खते सोबत दिली जातात. त्यामुळे वितरकांवर मानसिक त्रास सहन करून घेण्याची वेळ येत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी

हेही वाचा – नाशिकमधील कायदा- सुव्यवस्थेवर लक्षवेधी, भाजप आमदारांकडून गृहमंत्र्यांची भेट; छगन भुजबळ यांचे मौन

हेही वाचा – नाशिक : टवाळखोरांविरोधात पोलीस रस्त्यावर, वाहन तोडफोड प्रकरणी संशयितांना पोलीस कोठडी

जोडखत देणे बंद करावे, युरियाचा मुबलक प्रमाणात पुरवठा करावा, अशी मागणी करणारे निवेदन मनमाड, नांदगाव ॲग्रो डिलर्स असोसिएशनतर्फे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष किशोर लहाने, नांदगाव ॲग्रो डिलर्सचे अध्यक्ष आण्णा कवडे, विनोद शर्मा, गांगुर्डे, शांताराम चौधरी व राजकुमार केशरचंद आदी उपस्थित होते.