लोकसत्ता वार्ताहर

मनमाड : शहराजवळच असलेल्या चांदवड तालुक्यातील रापली शिवाराच्या हद्दीत मनमाड-दौंड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे थांबवावे लागले. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत काम करू देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात

प्रस्तावित मनमाड-दौंड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. मनमाडनजिक रापली शिवारात आणि हद्दीत हे काम करण्यासाठी संबंधित ठेकेदाराचे कामगार साहित्य साधनासह दाखल झाले होते. परंतु, शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे संबंधित प्रकल्पाच्या कामास या ठिकाणी सुरुवात झाली नाही. या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी रापली हद्दीत भूसंपादन व इतर कामे प्रस्तावित आहेत. नगरचौकी, रापली, वागदर्डी हद्दीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. पण मागण्या पूर्ण न केल्यामुळे त्यांनी भूमिपूजनास आक्षेप घेतला.

आणखी वाचा-जामिनावरील सुनावणीवेळी सुधाकर बडगुजर अनुपस्थित; पुढील सुनावणीवेळी हजर राहण्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत यावेळी माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांच्या वक्तव्यामुळे शेतकरी संतापले. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचे काम होऊ देणार नाही, जमिनीचा ताबा देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. शेतजमिनीची मोजणी करतांना फळबागा, डाळिंब, आंब्याचे झाड, बोरीचे झाड, जलवाहिनी, विहीर आणि घर याचा मोबदला प्रशासनाने हिशेबात न धरल्याने शेतकरी संतापले.

जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचे काम होऊ देणार नाही, जमिनीचा ताबा देणार नाही, अशी शेतकऱ्यांची भूमिका. भूसंपादनात जमीन गेलेल्यांच्या एका मुलाला रेल्वेत नोकरीस घेण्यात यावे, शेतकर्यांना शेतीचा मोबदला अत्यंत कमी दरात दिला आहे, त्याची वाढीव दराने म्हणजे एक लाख ४० हजार गुंठ्याप्रमाणे भरपाई देण्यात यावी, अशी मागणी. यावेळी ज्ञानेश्वर पगार, बापू गागरे, साईराम गागरे यांसह परिसरातील इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते भागवत झाल्टे यांनी दिली.

आणखी वाचा-नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील इंधन पुरवठा पुन्हा ठप्प; टँकरचालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन

शेतकऱ्यांचे म्हणणे काय ?

  • दुहेरीकरण मार्गाच्या प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांच्या एका मुलाला रेल्वेत नोकरीस घेण्यात यावे
  • शेतीचा मोबदला वाढीव दराने म्हणजे एक लाख ४० हजार रुपये गुंठ्याप्रमाणे भरपाई द्यावी.
  • मूळ नोटीसीवर कमी क्षेत्र, मोजणीवेळी जास्त क्षेत्र धरल्याची तक्रार