नाशिकमध्ये मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांचे समर्थक आमने-सामने आले होते. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे शिवसृष्टी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं बघायला मिळालं. दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

मनोज जरांगे दाखल होताच समर्थकांकडून घोषणाबाजी

मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील नाशिकमधील शिवसृष्टीला भेट देण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी छगन भुजबळ यांचे समर्थकही याठिकाणी उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील या परिसरात दाखल होताच, दोन्ही गटाच्या समर्थकांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाचं निर्माण झालं.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
Ajit Pawar Jayant Patil x
Jayant Patil : “अरे बाप नाही, तुझा काकाच…”, जयंत पाटलांचं अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे

हेही वाचा – उड्डाणपुलावरील दुरुस्ती कामामुळे गोंधळ; पूर्वकल्पना नसल्याने वाहनधारकांची गैरसोय, वाहतूक कोंडीत भर

भुजबळांच्या समर्थकांनी मनोज जरांगे यांचे पोस्टर फाडल्याचा आरोप

दरम्यान, या घटनेनंतर छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी मनोज जरांगे यांचे पोस्टर फाडले असून शिविगाळ केली, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी माध्यमांशी बोलताना केला. तसेच छगन भुजबळ यांच्या समर्थकांवर कारवाई करावी, अशी मागणी करत त्यांनी शिवसृष्टी परिसरातच ठिय्या आंदोलन सुरु केली. याशिवाय काही मराठा कार्यकर्त्यांनी मनमाड-नगर महामार्गही रास्तारोको आंदोलन केलं. जोपर्यंत छगन भुजबळ यांच्या समर्थकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही, अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली.

हेही वाचा – Ratan Tata : राज ठाकरेंच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या नाशिकच्या प्रोजेक्टची रतन टाटांना पडली होती भुरळ, म्हणाले होते…

मनोज जरांगेंकडून शांतता राखण्याचं आवाहन

अखेर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांची समजूत काढत शांतता राखण्याचं तसेच आंदोलन थांबवण्याचं आवाहन केलं. त्यानंतर मराठा आंदोलकांनीही मनोज जरांगे यांच्या विनंतीला मान देत आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला.