नाशिक – मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केल्याने त्यांना पाठिंब्यासाठी राज्यात ठिकठिकाणी साखळी उपोषण करण्यात येत असताना सरकार आरक्षणाविषयी निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ येवला तहसील कार्यालयासमोर मराठा उपोषणकर्त्यांनी मुंडण केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – नाशिक : काँग्रेसकडून भटक्या विमुक्तांचे संघटन; जिल्हा, शहर कार्यकारिणी लवकरच जाहीर

हेही वाचा – नाशिक: विशेष लोक न्यायालयात २९ प्रकरणे निकाली; पक्षकार, मयतांच्या वारसांना पावणेदोन कोटींची नुकसान भरपाई

येवल्यातील सकल मराठा समाज ठिय्या आंदोलन समितीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ४० दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. राज्यात सहा तरुणांनी आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली असतानाही सरकारला जाग येत नसल्यामुळे आंदोलन समितीच्या वतीने सरकारचा दशक्रिया घालून मुंडण करण्यात आले. याप्रसंगी या आंदोलन समितीचे संजय सोमासे, जालिंदर मेंढकर, निंबाजी फरताळे, गोरख संत, विजय मोरे, शिवलाल धनवटे, रवी शेळके, गोरख सांबरे आदींनी मुंडण केले. शासनाने अंत पाहू नये, असा इशाराही याप्रसंगी आंदोलकांनी दिला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha protesters shave their heads in protest against the government ssb