पुरुषांना गर्भगृहात प्रवेश बंदीमुळे विश्वस्तांविरोधात रोष
त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात पुरुषांना दर्शनासाठी बंदी घालण्याच्या विश्वस्तांच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर सोमवारी तीव्र पडसाद उमटले. स्थानिकांसह भाविकांनी या निर्णयाविरोधात देवस्थान कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या मुद्यावर ग्रामस्थांचा रोष लक्षात घेऊन तुंगार ट्रस्टने त्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी दर्शविली आहे.
शनिशिंगणापूर येथे चौथऱ्यावर जाऊन महिलांना देवताचे दर्शन घेऊ देण्याच्या मुद्यावरून सुरू झालेला वाद आणि न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर, त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी यापुढे मंदिराच्या गाभाऱ्यात पुरुषांनाही दर्शनासाठी जाता येणार नाही, असा ठराव मंजूर केला होता. याआधी केवळ पुरुषांना गर्भगृहात दर्शनासाठी गाभाऱ्यात जाता येत होते. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली आणि पुरोहित, स्थानिक नागरिक, भाविक यांची अस्वस्थता आंदोलनाच्या रूपाने बाहेर आली. नव्या निर्णयानुसार दिवसभरातून तीन वेळा होणाऱ्या सरकारी पूजेसाठी पूजाऱ्यांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जाईल. याआधी सकाळी सहा ते सात या एक तासात पुरोहित भाविकांना गर्भगृहात पूजेसाठी घेऊन जात असे. परंतु, या निर्णयामुळे सर्वावर प्रतिबंध आल्यामुळे संतापाचा उद्रेक झाला. स्त्रियांना गर्भगृहात प्रवेश नको म्हणून पुरुषांवरही बंदी घालणे म्हणजे तुघलकी स्वरूपाचा हा निर्णय असल्याची तक्रार भाविकांनी केली.
बारा ज्योतिर्लिगापैकी एक असलेल्या या मंदिरातील गर्भगृहात तीनशे वर्षांंपासून अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र आदी धार्मिक पूजा होतात तर काही भक्तांचे कायमस्वरूपी अनुष्ठान असते. त्यासाठी ओले वस्त्र अथवा सोवळे नेसून गर्भगृहात आजपर्यंत पूजा करता येत होती. पुरूषांचे पूजेचे हक्क का हिरावून घेतले जात आहेत, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला.
सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या समोर स्थानिकांची बैठक झाली. मोठय़ा संख्येने नागरिक त्यात सहभागी झाले. या निर्णयावरून उपस्थितांनी त्र्यंबकेश्वर विश्वस्तांच्या विरोधात घोषणाबाजी केली. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक, पुरोहित, महिला मंडळे यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान कार्यालयावर मोर्चा काढला. मंदिराला प्रदक्षिणा घालून कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. देवस्थानचे कोणीही विश्वस्त उपस्थित नसल्याने संबंधितांनी खुच्र्या खाली कराव्यात, विश्वस्तांचा मनमानी कारभार थांबलाच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. बंदीचा निर्णय घेऊन विश्वस्त भाविकांच्या भावनांची प्रतारणा करत असल्याचा आरोपही करण्यात आला. या आंदोलनाची माहिती समजल्यानंतर विश्वस्त यादवराव तुंगार, अॅड. श्रीकांत गायधनी उपस्थित झाले. मोर्चेकऱ्यांनी नित्य, नैमित्तिक पूजेसाठी भाविकांना गर्भगृहात जाण्यास वंचित ठेवू नये या मागणीचे निवेदन दिले.
तुंगार यांनी आपण ग्रामस्थां समवेत असून जिल्हाधिकारी यांनी सूचवल्यानुसार आम्ही ठराव केला. परंतु न्यायालयात जाण्यास तुंगार ट्रस्टची तयारी असल्याचे नमूद केले.
दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिरात महिला पूजारी नेमणूक झाल्यास वाद टळतील, महिलांना गर्भगृहात प्रवेशात बंदी असल्याने तेथे तातडीने महिला पूजक-पुजारी नेमल्यास वादावर नियंत्रण होइल असा तोडगा काही शासकीय अधिकाऱ्यांनी बोलून दाखविला. परंतु, स्थानिक महिलांनी आम्ही गर्भगृहात जाणार नाही आणि दुसऱ्या महिलांना जाऊ देणार नाही याचा पुनरुच्चार करत परंपरेने जे सुरू आहे, त्याबाबत भाविक-ग्रामस्थ समाधानी असल्याचे नमूद केले. त्यामुळे वेगळे पायंडे पाडून शांततेचा भंग होऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडली.