नाशिक – गायरान जमिनींविषयी असलेल्या अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या देण्यात आला.यावेळी जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गोरगरिब बेघर, भूमिहीन होतील.
३५ ते ४० वर्ष एकाच ठिकाणी राहणाऱ्या जनतेला कोणत्या हेतूने उदध्वस्त करण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. मोर्चा आणि आंदोलनामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.