नाशिक – मारकडवाडीतील मतदानाबाबत शंका असतील तर, निवडणूक आयोगाने लोकांच्या म्हणण्यानुसार तपास करावा. गडबड झाली असल्यास चौकशी होणे आवश्यक आहे. एखाद्या यंत्रात बिघाड असू शकतो. परंतु, सर्व यंत्रांमध्ये बिघाड होता, असे म्हणणे योग्य नाही, अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे मांडली.

ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणाऱ्या मारकडवाडीतील ग्रामस्थांशी रविवारी राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रमुख शरद पवार यांनी संवाद साधला. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावरून आठवले यांनी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी चौकशीची मागणी करतानाच विरोधकांनी पराभव मान्य केला पाहिजे, असा सल्ला दिला. लोकसभा निवडणुकीत महायुतीला कमी जागा मिळाल्या असता आम्ही ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले नाहीत. विरोधकांनीही चांगली मते मिळाल्यावर मतपत्रिकेवर मतदानाची मागणी केली नव्हती. विरोधकांनी चुकीचा पायंडा पाडू नये. आपली मते का कमी झाली, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आठवले यांनी मांडली.

people of Pardhi community will get caste and birth certificate
आयुष्यात ‘हे’ प्रथमच जातीचा दाखला पाहणार, पालकमंत्र्यांनी असे काय केले की…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
private hospital news in marathi
राज्यभरातील खासगी रुग्णालयांची झडती… आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनंतर आता…
Police officer beats up police inspector in nagpur
पोलीस निरीक्षकाला दिला कर्मचाऱ्याने चोप
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
Commissioner orders surgical strike on encroachments to break traffic jam
कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
Explosion at an ordnance manufacturing factory in Jawahar Nagar
भंडाऱ्यातील घटनेमुळे देशभरातील आयुध निर्माणीतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे का?
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

हेही वाचा : नाशिक : युवक मारहाणीच्या निषेधार्थ पिंपळगावात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

राज्यातील महायुती सरकारमध्ये रिपाइंला विधान परिषदेची एक जागा, एक मंत्रिपद आणि दोन ते तीन महामंडळांवर स्थान देण्याची मागणी करण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची हवा गेली. आपल्याशिवाय सरकार येणार नाही, या त्यांच्या स्वप्नांचा भंग झाला. त्यांना महायुतीत घेऊन काही फायदा होणार नाही. कडवी भूमिका घेत असल्याने महायुतीत मनसेची आवश्यकता नसल्याचा आठवले यांनी पुनरुच्चार केला.

Story img Loader