नाशिक: हाणामारी, मतदारांना अमिष दाखविण्याचे प्रकार आणि प्रचारातील आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बहुतांश बाजार समित्यांमध्ये दुरंगी लढती होत असून आपल्या हक्काचे मतदान पदरात पाडून घेण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे. यानिमित्ताने अनेक ठिकाणी महाविकास आघाडीप्रणित आणि शिवसेना-भाजपप्रणित पॅनल यांच्यात लढत होणार असली तरी काही ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षही एकमेकांविरुध्द भिडले आहेत.

जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी तर मनमाड बाजार समितीसाठी रविवारी मतदान होत आहे. स्थानिक राजकारणावर प्रभाव टाकणारी ही निवडणूक प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गांभिर्याने घेतली आहे. नाशिक बाजार समितीत परस्परांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे माजी सभापती देविदास पिंगळे आणि शिवाजी चुंभळे यांच्या पॅनलमध्ये सामना रंगणार आहे. या समितीत १८ जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात आहेत. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत विद्यमान आमदार दिलीप बनकर आणि माजी आमदार अनिल कदम या महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या पॅनलमध्ये चुरशीची लढत होणार आहे. या ठिकाणी १८ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात आहेत.

middle-class father video
‘बाप असेल त्या परिस्थितीत आनंदी राहायला शिकवतो…’ मध्यमवर्गीय बापाचा सुंदर VIDEO एकदा पाहाच…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
Success Story Of IPS officer Nitin Bagate
Success Story: प्रयत्नांती परमेश्वर! एकेकाळी SP कार्यालयाबाहेरील भाजीविक्रेता आज तेथेच डीएसपी पदावर कार्यरत; वाचा, ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट…
Dr Kartik Karkera from Mumbai
मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा नाशिक मविप्र मॅरेथॉन -२०२५ चा विजेता, पहिले तीनही धावपटू महाराष्ट्रातील
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Ajit Pawar clarification on the Beed case pune news
पक्ष न पाहता दोषींना कठोर शिक्षा; बीड प्रकरणी अजित पवार यांची स्पष्टोक्ती
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ

हेही वाचा >>>साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! १ मेपासून शिर्डीत बेमुदत बंदची हाक, ‘या’ कारणासाठी ग्रामस्थांसह सर्वपक्षीयांचा निर्णय

सिन्नर बाजार समितीत राष्ट्रवादीचे आमदार माणिक कोकाटे आणि विरोधी ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे यांच्या पॅनलमध्ये लढत होणार आहे. या समितीत ४५ उमेदवार रिंगणात आहेत. घोटी समितीत तिरंगी लढतीमुळे चुरस निर्माण झाली आहे. नांदगाव समितीत ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आ. सुहास कांदे यांच्या पॅनल विरोधात महाविकास आघाडीचे पॅनल आहे..महाविकास आघाडीच्या पॅनलचे नेतृत्व माजी आमदार पंकज भुजबळ आणि अनिल आहेर हे करीत आहेत. मनमाड समितीत आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात पाचही माजी आमदारांनी एकजूट केली आहे. येवल्यात माजी मंत्री आ. छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला आहे.लवकरच जिल्हा परिषदेसह पंचायत समिती, नंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी बाजार समितीवर वर्चस्व अतिशय महत्वाचे मानले जाते. त्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांनी कंबर कसली आहे.

हेही वाचा >>>अंतर्धान मतदार अन् दूरवरील मैदानाजवळील मतदान केंद्र- मनमाड बाजार समिती निवडणूक

मालेगावात भुसे-हिरे गटात चुरस

मालेगाव बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे या पारंपरिक विरोधकांच्या दोन्ही गटांमध्ये चुरशीचा सामना रंगला आहे. बाजार समितीमधील जय-पराजयाचा तालुक्याच्या आगामी राजकारणावर प्रभाव पडणार असल्याची शक्यता असल्याने भुसे व हिरे या दोन्ही गटांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केल्याचे दिसत आहे. सोसायटी गटातील ११,पंचायत समिती गटातील चार,व्यापारी गटातील दोन व हमाल-मापारी गटातील एक अशा एकूण १८ जागांसाठी समितीची निवडणूक होत आहे. त्यासाठी भुसे यांच्या नेतृत्वाखाली आपलं पॅनलने सर्व १८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. हिरे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलने १५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. व्यापारी तसेच हमाल व मापारी गटातील तीन जागांवर हिरेंनी उमेदवार दिले नाहीत. या दोन पॅनलव्यतिरिक्त शेतकरी व सार्वजनिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी बाजार समिती बचावचा नारा देत तिसरे पॅनलही निवडणूक रिंगणात उतरविले आहे. या पॅनलने सहा उमेदवार उभे केले आहेत. भुसे व हिरे या दोन्ही गटांनी निवडणूक जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालविले. त्याचाच भाग म्हणून उभय गटांकडून परस्परांविरुध्द आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. बाजार समिती बचाव पॅनलने मात्र भुसे व हिरे या दोन्ही गटांना लक्ष्य केले आहे. अर्थात तीन पॅनल असले तरी खरी लढत भुसे व हिरे यांच्या पॅनलमध्येच होत असल्याचे चित्र आहे.

Story img Loader