मनमाड : शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे या राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर नादुरूस्त झाल्याने शनिवारी तब्बल १० तास वाहतूक विस्कळीत झाली. दुपारी एकनंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली. तत्पूर्वी रस्त्याच्या दूतर्फा पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. राज्य परिवहन महामंडळाच्या बसही अडकल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.

शनिवारी सकाळी पाच ते सहा तास मालेगांव, मनमाड, येवला, कोपरगाव, शिर्डी या सर्वच महत्वाच्या गावांमधून होणारी वाहतूक ठप्प झाली. सकाळी सहाच्या सुमारास शहरातून जाणार्‍या या महामार्गाच्या रेल्वे उड्डाण पुलावर येवल्याकडून मालेगांवकडे जाणाऱ्या कंटेनरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. ते जागीच थांबले. कंटेनर बाजूलाही घेता येत नसल्याने काही वेळात रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. शालेय वाहने, बस, मालवाहतूक करणारी वाहने अडकून पडली. वाहनांची ही रांग येवला शहराच्याहीपुढे तर मालेगांवपर्यंत पोहोचली. मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याने दुचाकीस्वारांनाही फटका बसला. या महामार्गावरून अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर वाहतूक करतात.

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार

हेही वाचा…लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे नेणाऱ्या महिलेचा अपघातात मृत्यू

चार महिन्यांपूर्वीच या महामार्गावर संरक्षक कठडा कोसळून हा रस्ता वाहतुकीसाठी तीन महिने बंद होता. त्याचे परिणाम संपूर्ण राज्याच्या वाहतुकीवर झाले होते. शिवाय या मार्गावर लहान-मोठे अपघात नेहमीच होतात. कंटेनर बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली.