धुळे – शहरातील प्रभात नगर आणि विटाभट्टी भागातील महापालिकेच्या दवाखान्यांना अचानक भेट दिली असता कुलूप आढळून आल्याने संतप्त महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “धरणगावसह जळगाव जिल्ह्यात पाच शहरांमध्ये एमआयडीसी”; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हेही वाचा – नाशिक : निकृष्ट भोजनाची राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडून चौकशी, एकलव्य निवासी शाळेतील प्रकार; जिल्हाधिकाऱ्यांना समन्स

परिसरातील नागरिकांनी दवाखान्यांकडील वैद्यकीय सेवांवर आक्षेप घेत महापौरांकडे तक्रारी केल्या. दवाखाना रोज वेळेवर उघडतोच असे नाही. खोकल्यावरदेखील औषधे वेळेवर मिळत नाही, अशी तक्रार परिसरातील नागरिकांनी महापौर चौधरी यांच्याकडे केली. दवाखाना बंद असल्याचे दिसताच महापौर चौधरी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. दवाखान्याची वेळ नेमकी काय आहे, याची माहिती घेतली. सकाळी आठ ते १२ आणि दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा अशी वेळ असल्याचे डॉ. शेख यांनी महापौरांना सांगितले. असे असतांना अद्यापही दवाखान्याकडे एकही कर्मचारी फिरकलेला नाही, असे सांगत महापौरांनी संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayor angry seeing dhule mnc hospitals locked order action against officers and employees ssb
Show comments