धुळे – तालुक्यातील चाळीसगाव-धुळे मार्गावरील तिखी फाट्याजवळ वैद्यकीय व्यावसायिकास अडवून बंदुकीचा धाक दाखवित तिघांनी त्याची मोटार सायकल, भ्रमणध्वनी आणि आठ हजार रुपये याप्रमाणे २८ हजार रुपयांच्या मुद्देमालाची लूट केली. यासंदर्भात प्रशांत साळुंखे (रा.आर्य नगर, वडेल रोड, धुळे) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> नाशिक : केंद्राने राखीव साठा कांदा बाजारात आणल्यास रास्तारोको -उत्पादक संघटनेचा इशारा

साळुंखे हे चाळीसगावहून धुळ्याकडे येत असताना त्यांना धुळे तालुक्यातील गरताड शिवारात असलेल्या तिखी फाट्याजवळ तिघांनी बंदुकीचा धाक दाखवून अडविले. रविवारी रात्रीची ही घटना आहे. अज्ञातांनी दमदाटी करीत साळुंखे यांच्या ताब्यातील १५ हजार रुपयांची मोटारसायकल, पाच हजार रुपयांचा भ्रमणध्वनी आणि आठ हजार रुपयांची रोख रक्कम असा सुमारे २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून नेला. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.