महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षेवेळी सोमवारी जीव रसायनशास्त्र (बायोकेमिस्ट्री) भाग एकऐवजी जीवरसायनशास्त्र भाग दोनच्या प्रश्नपत्रिकेचे पाकीट उघडले गेल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. हा प्रकार उघड झाल्यानंतर विद्यापीठाने जीवरसायनशास्त्र भाग दोनची प्रश्नपत्रिका युध्दपातळीवर बदलली. राज्यातील सर्व केंद्रावर दुसरी प्रश्नपत्रिका विद्यापीठाने उपलब्ध केली. बुधवारी ही परीक्षा झाली. याबाबतची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ .संदीप कडू यांनी दिली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी-२०२३ सत्राच्या लेखी परीक्षा सध्या सुरू आहेत.

हेही वाचा >>> आशा, गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदेसमोर ठिय्या

TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान
JEE Advanced 2025 New Eligibility Rules
JEE Advanced 2025 : जेईई ॲडव्हान्स्डच्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
Thane district, 578 children came under education stream, Survey of out of school children
ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात
IFS, UPSC, girl opt IFS, IAS IPS, Vidushi Singh,
आयएएस, आयपीएसचा पर्याय सोडून आजीआजोबांच्या स्वप्नपूर्तीसाठी आयएफएसची निवड

राज्यभरातील ५० केंद्रावर ही परीक्षा होत असून त्यात एकूण आठ हजार ३९५ विद्यार्थी एमबीबीएस शिक्षणक्रमाला प्रविष्ठ झाले आहेत. सोमवारी एका केंद्रात अनावधानाने उघडल्या गेलेल्या वेगळ्या प्रश्नपत्रिकेच्या पाकिटाने विद्यापीठाला तातडीने उपाययोजना करावी लागली. सोमवारी जीवरसायनशास्त्र भाग एकचा पेपर होता. यावेळी एका केंद्रावर जीवरसायनशास्त्र भाग दोनच्या प्रश्नपत्रिकेचे पाकिट उघडले गेले. हे लक्षात आल्यावर परीक्षा केंद्राने विद्यापीठाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर त्या दिवशी जीवरसायनशास्त्र भाग एकचा पेपर वेळापत्रकानुसार पार पडला. जीवरसायनशास्त्र भाग दोनचा पेपर बुधवारी होणार होता. कुलगुरुंच्या निर्देशानुसार विद्यापीठाने राज्यातील ५० परीक्षा केंद्रांवर जीवरसायनशास्त्र भाग दोनची दुसरी प्रश्नपत्रिका पुरविण्यात आल्याचे कडू यांनी सांगितले. तातडीने प्रश्नपत्रिका बदलल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा प्रसंग टळला. परीक्षा प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ नयेत तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाकडून तत्परतेने कार्यवाही केली. संबंधित परीक्षा केंद्रावर घडलेल्या घटनेबाबत विद्यापीठाकडून चौकशी केली जात आहे.