जळगाव: गेल्या सात वर्षांत जिल्हा दूध संघाची झालेली प्रगती सर्वांसमोर आहे. दोन मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांनी दूध संघ निवडणुकीसाठी अर्ज भरले. त्यामुळे त्यांना मंत्रिपदापेक्षा दूध संघ महत्त्वाचा वाटतो. त्यांनी या निवडणुकीत कितीही पेट्या अथवा खोके वापरले तरी दूध संघात आम्हीच जिंकणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसेंनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> नाशिक:अपघात प्रवण क्षेत्रात सिग्नलची मात्रा ,उपायांसाठी खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या... (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP President Election : भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Vijay Vadettiwar statement regarding the Leader of the Opposition Nagpur news
सरकारला विरोधी पक्षनेता हवा असेल तरच नाव देऊ -वडेट्टीवार
Pusad Naik family, Indranil Naik , Vasantrao Naik,
अजित पवारांसोबत गेलेल्या नाईक घराण्याला मंत्रिपदाची भेट ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

शहरातील आमदार खडसेंनी आपल्या निवासस्थानी  पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील उपस्थित होते. ते म्हणाले की, दूध संघाच्या इतिहासात एवढा प्रतिसाद अर्ज दाखल करण्यासाठी कधीही नव्हता. याचा अर्थ असा आहे की, दूध संघ चांगल्या अवस्थेत आला आहे. मागच्या वेळी डबघाईस होता आणि त्यामुळे फार काही प्रतिसाद नव्हता. आम्हाला फार काही लोकांमध्ये फिरावे लागले नाही. निवडणुका झाल्या. त्यावेळी फार काही उत्साह नव्हता. गेल्या सात वर्षांत दूध संघाने केलेली प्रगती ही लक्षणीय आहे. आता दूध संघाचे भागभांडवल सोळा कोटी आहे. पूर्वी ते चार कोटी होते. सातत्याने हा दूध संघ नफ्यात ठेवला. जवळपास शंभर कोटींचा प्रकल्प या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून उभा राहिला. अशी कामे दूध संघात झाली. त्यामुळे दूध संघाची आर्थिक स्थिती चांगली झाली. त्यामुळे अनेकांच्या नजरा या दूध संघाकडे वळलेल्या दिसताहेत.

हेही वाचा >>> नाशिक:मानधनापेक्षा खर्च अधिक;अंगणवाडी सेविकांचा मतदार याद्यांच्या कामास नकार

आता अनेक मान्यवरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये मंत्र्यांनाही याचा लोभ आवरता आला नाही. चांगल्या शब्दांमध्ये मंत्रिपदापेक्षा दूध संघ महत्त्वाचा वाटतो. म्हणून ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील हे दोन्ही मंत्री, तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, पाचोरा-भडगावचे आमदार किशोर पाटील, काही माजी आमदार यांनी दूध संघासाठी अर्ज भरले आहेत. एकंदरीत एकनाथ खडसे व त्यांचे सहकारी विरुद्ध सारे असे एकंदरीत आता एकत्र आल्याचे चित्र दिसते आहे. भविष्यात अजून माघारी बाकी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व जागांसाठी उमेदवारी अर्ज  भरले आहेत. जे नियमानुसार भरले आहेत. या ठिकाणी गेली पन्नास वर्षे तालुका मतदारसंघात तालुक्यातलाच प्रतिनिधी उभा राहत होता. तोच निवडून येत होता. म्हणून प्रत्येक तालुक्याला आम्ही प्रतिनिधित्व देत होतो. जिल्हा दूध संघात खडसे परिवाराला रोखण्यासाठी जिल्ह्यातील सत्ताधार्‍यांनी सत्तेचा गैरवापर करून उमेदवारीबाबतचा नियम शेवटच्या १५ मिनिटांत बदलविल्याचा आरोप खडसेंनी केला.

हेही वाचा >>> पदवीधर मतदार नोंदणीत अहमदनगर वरचढ; नाशिकपेक्षा दुप्पट अर्ज

आमदार चव्हाण यांना आताच कसा भ्रष्टाचार दिसला? दूध संघाचे संपूर्ण सात वर्षांचे लेखापरीक्षण करावे, तसेच करीत दूध संघातील चोरीविषयी जबाब बदलविण्यासाठी दबाव टाकणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली. दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचे नाव त्या तालुक्याच्या मतदार यादीत असणे आवश्यक असताना आमदार मंगेश चव्हाणांनी मुक्ताईनगर तालुका मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राजकीय दबावाखाली होत असून, याबाबत आम्ही न्यायालयातही दाद मागणार आहोत, असेही ते म्हणाले.

Story img Loader