जळगाव – नागपूर अधिवेशनात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी यांच्या नावे असणाऱ्या जमिनीवरून गौण खनिजाचे उत्खनन करीत तब्बल चारशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य शासनाचे पथक मुक्ताईनगरात दाखल झाले आहे. तीन दिवस या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

नागपूर अधिवेशनात पाटील यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारात मंदाकिनी खडसे यांच्या नावे असणाऱ्या ३३ हेक्टर ४१ आर जमिनीवरून गौण खनिजाचे उत्खनन करून तब्बल ४०० कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप लक्षवेधीच्या माध्यमातून केला होता. त्यासंदर्भातील पेनड्राइव्हसह ड्रोनव्दारे करण्यात आलेले चित्रीकरण आणि अन्य ध्वनिचित्रफितीचे पुरावे असल्याचा दावा केला होता.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Accused who surrendered in Kalyaninagar accident case remanded in police custody Pune
कल्याणीनगर अपघात प्रकरणात शरण आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..

हेही वाचा – धुराचा आरोग्यावरील परिणाम टाळण्यासाठी प्रशासन सतर्क, जिंदाल सभोवतालच्या गावांमध्ये दवंडीद्वारे सूचना

मंदाकिनी खडसेंच्या नावाने असलेल्या संबंधित जमिनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना देण्यात आला होता. जानेवारी २०१९ मध्ये आधीच बिनशेती परवाना झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज देण्यात आला. प्रांताधिकाऱ्यांनीही काही दिवसांतच त्यास तत्काळ परवानगी दिली. संबंधित जमिनीतूनच अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

१० हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी असताना तेथून लाखो ब्रास मुरुमासह अन्य गौण खनिजाचे उत्खनन झाले असल्याचे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले होते. या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. यासंदर्भात महसूलमंत्र्यांनी महसूल खात्याच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याचेही आश्वासन दिले होते.
याअनुषंगाने मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या गौण खनिज उत्खननाच्या चौकशीसाठी राज्य शासनाचे पथक दाखल झाले असून जमीन मोजमापसाठी ईटीएस यंत्रही आणण्यात आले आहे. तीन दिवस या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात भुसावळ व मुक्ताईनगरचे प्रांताधिकारी रामसिंह सुलाने यांनी दुजोरा दिला आहे.