मनमाड – शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे या राष्ट्रीय महामार्गावर शहरात नवीन उड्डाणपूल उभारणे आणि याच मार्गाला शहराच्या बाहेरून वळण रस्ता करण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या इंदूर-पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपूल खचल्याने या मार्गावरची संपूर्ण वाहतूक तीन दिवसांपासून बंद आहे. सर्व वाहतूक वेगवेगळ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. या खचलेल्या उड्डाण पुलाची शुक्रवारी डाॅ. भारती पवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी रेल्वे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. रेल्वे उड्डाण पुलाचा खचलेला कठडा आणि भाग तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पुलाच्या इतर भागांचे संरचनात्मक लेखापरीक्षण करून दुरुस्तीचे काम हाती घेण्याच्या सूचना केल्या.

हेही वाचा – छापील वीज देयकास ४० हजार ग्राहकांचा नकार; पर्यावरणस्नेही मार्गाचा अवलंब

हेही वाचा – सौद्यानंतर एक दिवस आधी कोसळलेल्या पावसाने शेतकरी उदध्वस्त; अवकाळीने हंगामपूर्व द्राक्षांचे मोठे नुकसान

या जागेवर नवीन उड्डाणपूल आणि वळण रस्त्याबाबत गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी करणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. उड्डाण पुलाचा कठडा खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद आहे. ती अन्यत्र मार्गाने वळवण्यात आली आहे. शिवाय दोन भागांना जोडणारा हा उड्डाण पूल असल्याने नागरी वस्तीच्या मोठा भागाचा संपर्क खंडित झाला आहे. परिणामी पादचारी आणि वाहनचालकांची गैरसोय होत आहे. याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ व नितीन पांडे, शहराध्यक्ष संदीप नरवडे, सचिन संघवी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील, रेल्वे व बांधकाम विभागाचे अधिकारी व पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister bharti pawar inspected the railway flyover on the indore pune national highway passing through the central part of manmad city ssb
Show comments