निधी वाटपाचा निर्णय वित्तमंत्री घेतात, पण त्यावर अंतिम अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले होते. तेव्हाचे मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री यात फरक आहे. यावेळी आम्हाला तसा अनुभव येणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचे राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शुंभूराज देसाई यांनी सांगितले.

हेही वाचा >>> त्र्यंबकेश्वर देवस्थानात पुरातत्व खात्यामुळे सुविधांना मर्यादा; नीलम गोऱ्हे यांचे मत

Ganesh Naik challenged the Chief Minister through CIDCO and Urban Development Department
अस्वस्थ गणेश नाईक यांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान
Ganesh Naik, eknath shinde,
अस्वस्थ गणेश नाईकांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान
Amol Mitkari
लाडकी बहीण योजनेत विरोधकांकडून गैरव्यवहार? अमोल मिटकरी म्हणाले, “सेतू केंद्रांवर एजंट सोडून…”
Eknath Shinde order to office bearers to start preparations for Legislative Assembly election
विधानसभेच्या तयारीला लागा; मुख्यमंत्र्यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश; बुधवारी वर्धापन दिन
modi 3.0 women cabinet ministers
पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातील स्त्रीशक्ती; मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ‘त्या’ सात महिला मंत्री कोणत्या?
Nitin Gadkari will take oath as Union Cabinet minister for the third time
गडकरींच्या रुपात सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात नागपूरला स्थान
Modi 3 0 Cabinet Narendra Modi swearing in ceremony Cabinet posts
भाजपाकडून राजनाथ-गडकरी निश्चित! एनडीएच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात घटक पक्षातील कुणाला किती मिळणार मंत्रिपदे?
Deputy Chief Minister of the state Devendra Fadnavis resigned Also started in Delhi
देवेंद्र फडणवीसांचे राजीनामानाट्य सुरूच

महाविकास आघाडीच्या काळात अजित पवार यांनी निधी दिला नसल्याच्या तक्रारी शिंदे गटाकडून झाल्या होत्या. तेच अजितदादा आता महायुतीच्या सरकारमध्ये वित्तमंत्री म्हणून आल्याने शिंदे गटाची पंचाईत झाली आहे. रविवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या देसाई यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर निधी वाटपात आता दुजाभाव होणार नसल्याचा दावा केला. महायुतीत तिसरा पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा समावेश झाला आहे. तिन्ही इंजिन समन्वयातून चालतील. आगामी काळात कामाचा वेग दृष्टीपथास येईल. पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरू असल्याच्या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी समन्वय साधून निर्णय घेणार असल्याचे सूचित केले. राज्यातील महायुती सरकारने २०० हून अधिकचे बहुमत प्राप्त केले आहे. महायुतीत कुणाला समाविष्ट करायचे हे ठरविण्याचा अधिकार प्रमुख नेत्यांचा आहे. उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> जळगाव : चांद्रयान-३ साठी हातेडच्या सुपुत्राची महत्त्वपूर्ण भूमिका; शास्त्रज्ञ संजय देसर्डा यांची द्रवरूप इंधनासाठी कामगिरी

अजित पवार यांच्या सिल्व्हर ओक भेटीबाबत त्यांनी प्रतिभाकाकुंवर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी ही भेट असेल. यात राजकीय काही वाटत नसल्याचे देसाई यांनी नमूद केले. राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि मंत्री आम्ही पक्ष सोडलेला नसल्याचे सांगतात. आमचे नेते शरद पवार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सरकारमध्ये सामील झालेले मंत्री राष्ट्रवादीचे आहेत. महायुती सरकारला आशीर्वाद द्यायचा की नाही, हे पवार यांनी ठरवावे. तो राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न असल्याचे ते म्हणाले. संजय राऊत यांच्या विधानांची देसाई यांनी खिल्ली उडवली. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. या वर्षात राऊत यांनी जे काही सांगितले, तसे झाल्याचे एक उदाहरण दाखवा, असा प्रश्न करीत प्रसारमाध्यमांनी त्यांना फारसे गांर्भियाने घेण्याची गरज नसल्याचा सल्ला देसाई यांनी दिला.

अवैध मद्याची वाहतूक नको गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्याची वाहतूक होणार नाही आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना देण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले. नागरिकांनी मद्यपान करून वाहन चालवू नयेत. या दिवशी भरधाव, धोकादायकपणे वाहने चालविली जाणार नाही याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.