नाशिक – आदिवासी भागात वन संपत्ती विपूल प्रमाणात आहे. उपलब्ध वन संपत्तीचा वापर करून प्रक्रिया उद्योगासाठी अनेक महिला बचतगट, उद्योग संस्था पुढे येत आहेत. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत या प्रक्रिया उद्योगांसाठी आदिवासी उद्योजकांना आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिले जाईल, असे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

शहरातील गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजनांचा सामंजस्य करार सोहळा आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
congress leader rahul gandhi made serious allegations on pm modi in jharkhand
पंतप्रधान बड्या उद्योजकांचे हित जोपासतात; राहुल गांधी यांचा आरोप
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन

हेही वाचा – जळगाव : मालवाहू वाहनाच्या धडकेने चार गंभीर जखमी

आदिवासी भागात वन संपत्ती विपूल प्रमाणात आहे. उपलब्ध वन संपत्तीचा वापर करून प्रक्रिया उद्योगासाठी अनेक महिला बचतगट, उद्योग संस्था पुढे येत आहेत. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत या प्रक्रिया उद्योगांसाठी आदिवासी उद्योजकांना आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे डॉ. गावित यांनी सांगितले. आदिवासी बांधवांना उद्योजकता प्रशिक्षणातून व्यवसाय उपलब्ध करून त्यांना आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टीने शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ कार्यरत आहे. बचतगट, वनधन केंद्र, ग्रामीण समूह, फळ प्रक्रिया उद्योजक, राईस मिल, वनऔषधी उद्योजक, गृहोद्योग यांना आवश्यक वित्त पुरवठा करण्यात शबरी महामंडळ अग्रेसर आहे. येणाऱ्या काळात आदिवासी बांधवांनी प्रक्रिया उद्योगातून तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील. ज्या भागात जे वनउपज उपलब्ध आहेत, त्यांचा उपयोग आदिवासी बांधवांनी आपल्या उद्योगासाठी केला पाहिजे. उद्योगासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. आदिवासी विकास विभागामार्फत अनेक योजना राबविल्या जात असून आदिवासी महिला उद्योजकसुद्धा पुढे येत आहेत. परिश्रम व सहभागातून आगामी काळात आदिवासी बांधव नक्कीच यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला येतील, असा विश्वास आदिवासी विकासमंत्री डॉ. गावित यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – राज ठाकरे यांचा नाशिक दौरा निश्चित

यावेळी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, एन. डी. गावित, रायासिंग वळवी, रमेश सवरा, चैराम पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळअंतर्गत १० स्वयंसहाय्यता बचत गटांना प्रत्येकी पाच लाख कर्ज मंजुरी आदेशांचे वितरण डॉ. गावित यांच्या हस्ते करण्यात आले.