नाशिक : ओझरजवळील दात्याने शिवारात सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेने आईला बरोबर घेऊन ओझर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मंगळवारी दुपारी सावत्र पित्याने मुलीला बकऱ्यांसाठी चारा आणायला चल, असे सांगत बरोबर नेले. द्राक्षबागेत संशयित बळजोरी करु लागल्यावर पीडितेने आरडाओरड केली.
हेही वाचा…नाशिक : पेसा भरतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
संशयिताने पीडितेला मारहाण करुन ऊसाच्या शेतात नेत जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. तक्रारीनंतर ओझर पोलिसांनी संशयितास बुधवारी पहाटे अटक केली.