नाशिक : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर युवकाने लग्नास नकार दिला. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आकाश राजू खाडे (१९, काझीगडी, भद्रकाली) या संशयितास अटक केली. संशयिताने मुलीशी प्रेमसंबध निर्माण केले होते. लग्नाचे आमिष दाखवून युवतीस त्याच्या घरी आणि अन्य ठिकाणी नेऊन वेळोवेळी बलात्कार केला. युवती गर्भवती राहिली. ही बाब कुटुंबीयांना कळताच त्यांनी युवकाकडे लग्नाचा आग्रह धरला. त्याने नकार दिल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा