नाशिक – जिल्ह्यात काही विशिष्ट वेळी मोठ्या प्रमाणात होणारे रक्तदान तर, सण, उत्सव आणि उन्हाळ्यात जाणवणारा तुटवडा पाहता जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढीच्या वतीने राष्ट्रीय रक्त धोरणानुसार रक्त सुरक्षा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘मिशन ब्लड: नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ अभियान राबवण्यात येणार आहे.

येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात सेवा पंधरवाडा आणि रक्तदान मास ऑक्टोबरच्या समारोप समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांनी ही माहिती दिली. मेट्रो रक्तपेढी जिल्हा रुग्णालय, शासकीय रक्तपेढी, विभागीय सेवा संदर्भ सेवा रुग्णालय आणि इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका

हेही वाचा >>> जळगाव : आदिवासी कोळी आंदोलकांचा जळगाव जिल्ह्यात रास्तारोको; उपोषणकर्त्या महिलांसह पुरुषांच्या प्रकृतीत बिघाड

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, विभागीय रक्त संक्रमण अधिकारी डॉ. पुरूषोत्तम पुरी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण, आयएमएचे अध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ, कर्करोग तज्ज्ञ डॉ. श्रीकांत खरे, मोतीवाला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. फारूख मोतीवाला, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीलेश पाटील, के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. स्वानंद डोंगरे, मोतीवाला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. स्वानंद शुक्ला, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या डॉ. मधुरा धारणे, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. सतीश शिंपी, मुख्य रक्त संक्रमण अधिकारी डॉ. संदीप सांगळे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दीपक पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> देवळ्यात शेत जमिनीच्या वादातून हाणामारी; तीन जखमी, १४ जणांविरुद्ध गुन्हा

यावेळी विभागीय रक्त संक्रमण अधिकारी डॉ. पुरी यांनी, राष्ट्रीय सणावेळी मोठ्या प्रमाणावर रक्तदान होत असले तरी त्यावेळी संकलित झालेल्या रक्तसाठ्याला काही मर्यादा असतात, असे सांगितले. काही वेळा रक्ताचा तुटवडा जाणवतो, अशा स्थितीत रक्त संकलन हे नियमीत होणे गरजेचे आहे. यासाठी रक्तदात्याने वाढदिवसाला रक्तदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. क. का. वाघ महाविद्यालयात हा प्रयोग सुरु करण्यात आला असून डिसेंबर अखेर पर्यंत जिल्हा स्तरावर सर्व ठिकाणी प्रायोगिक तत्वावर तर जानेवारीपासून नियमित सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. मनोरंजनाच्या माध्यमातून रक्तदानाविषयीचे समज-गैरसमज, अज्ञान आणि भीती दूर होवून मिशन ब्लड यशस्वी होणार असल्याचे डॉ. चारूदत्त शिंदे यांनी सांगितले. आरोग्य उपसंचालकांच्या सूचनेनुसार वाढदिवस रक्तदान योजना अर्थात बर्थ डे ब्लड डोनर्स क्लबची संपूर्ण जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येणार असून नाशिक हे मिशन ब्लड: नो शॉर्टेज, नो वेस्टेज या उपक्रमाचे आदर्श ठरण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. अभियानाच्या समारोपप्रसंगी ‘स्वर रूधीरम् रक्ताचीये रंगी’ हा संगीतमय कार्यक्रम झाला. यात गण, गवळण, लावणी, पोवाडे, अभंग, जोगवा, भारूड या लोकगीतांच्या माध्यमातून ऐच्छिक रक्तदानाविषयी प्रबोधन करण्यात आले. अभियानात सहभागी झालेल्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे कर्करोग शल्य विशारद डॉ. शंतनू पवार यांनी आभार मानले.

Story img Loader