धुळे : सरकार बदलताच मंजूर असलेल्या अनेक विकास कामांना स्थगिती देण्यात आल्याने ती उठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाच्या मंत्र्यांना विनंती करावी लागत आहे. आमदार कुणाल पाटील आणि माजी आमदार गोटे यांच्याही कामांना स्थगिती देण्यात आली होती, अशी माहिती एमआयएमचे आमदार फारुक शहा यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकविरा देवी मंदिराचा सभामंडप आणि भक्त निवास दुरुस्तीसाठी मंजूर झालेल्या कामांची सुरुवात सोमवारी आमदार शहा यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांनी गेल्यावर्षी महाविकास आघाडी सरकारकडून २३ फेब्रुवारी २०२२ रोजी शाह बाबांचा दर्गा, महेबुसुभानी दर्गा, विठ्ठल मंदिर सुशोभिकरण आदी कामांसाठी निधी मंजूर करून आणला होता, असे सांगितले. नवे सरकार आल्याने या कामांना स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती उठविण्यासाठी पाठपुरावा करावा लागला. मुख्यमंत्री तसेच पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांना भेटून स्थगिती उठवली. माजी आमदार अनिल गोटे यांनी बनविलेल्या पुलाच्या कामालाही स्थगिती मिळालेली होती. गोटे यांनीही हे काम मंजूर करून घेतले होते. त्या कामाचीही स्थगिती उठलीच, पण काही निधीही मंजूर करून आणला होता. यामुळे त्या रखडलेल्या पुलाचेही काम झाले. सरकार बदलल्यानंतर अनेक कामे थांबविण्यात आली असल्याचे शहा यांनी सांगितले.

हेही वाचा – जळगाव : देवगिरी महोत्सवाचा समारोप; ‘भाई का बड्डे’ सर्वोत्कृष्ट लघुपट, ‘ये गांव मेरा’ उत्कृष्ट महितीपट

हेही वाचा – पांझरा नदीकाठ विकास कामांचा बोजवारा, धुळ्यात ठाकरे गटाचा अभियंत्यांना घेराव

आमदार कुणाल पाटील यांच्याही अब्जावधी रुपये खर्चाच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. ही कामे होतील की नाही, आज सांगता येणार नसल्याचा दावा फारुक यांनी केला. धुळेकरांसाठी आपण नुकतेच महामार्गावर आंदोलन केल्याचे फारुक यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla farooq shah displeasure on task of requesting the minister to lift the stay on approved works in dhule ssb