काही पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर केले असले तरी आमच्याकडे पर्याय तयार आहेत. राजकारणात हे होत असते. एक-दोघे गेल्याने मनसेला काहीही फरक पडत नाही. उलट एखाद्याला आपल्याकडे ओढून विरोधकांना काय मिळते, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी उपस्थित केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नाशिक : वाहतूक समस्यांनी अपघात,कोंडी अन् उद्योग-व्यवसायालाही झळ; वाहतूकदार संघटनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

बाळासाहेबांची शिवसेना पक्षात मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर अमित यांनी पक्षात लोक येत-जात असतात, असे सांगितले. मुंबईत भाजपच्या १५० जणांनी मनसेत प्रवेश घेतल्याचा दाखला दिला. राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे नाशिकमधून एक-दोघे गेले तरी मनसेवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले. दोन दिवसीय दौऱ्यात अमित यांनी शाखाध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. हा दौरा निवडणुकीच्या तयारीसाठी नव्हे तर, पक्ष बांधणीसाठी होता.

हेही वाचा >>> जळगाव: मधुकर साखर कारखाना कर्मचार्‍यांचे महामार्गावर आंदोलन – सहकार मंत्र्यांकडून विक्री प्रक्रियेला स्थगिती

महानगरपालिका निवडणूक लवकर लागेल हे आपण अनेक दिवसांपासून ऐकत आहोत. एप्रिल, सप्टेंबर कानावर येत आहे. पण निवडणूक कधी लागतील ते जाहीर झाल्यावर आपण त्यावर बोलू, असे त्यांनी सूचित केले. विद्यार्थी सेनेच्या नियुक्तींसाठी हा दौरा होता. पदाधिकाऱ्यांना मुंबईला बोलाविण्याऐवजी आपण नाशिकला आलो. महाविद्यालयीन स्तरावर संघटना स्थापन करायची आहे. त्यादृष्टीने तयारीला वेग दिला जाणार असून जानेवारीत पुन्हा नाशिकला येणार आहे. काही वर्षापूर्वी नाशिक मनसेचा बालेकिल्ला होता. महानगरपालिकेत पक्षाची सत्ता होती. मनसेचा तो टप्पा पुन्हा नक्की परत येईल, असा विश्वास अमित यांनी व्यक्त केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns have substitutes against those who left party says mns youth wing chief amit thackeray zws