लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जळगाव: गुलाबभाऊ पाणी द्या… पाणी द्या… अन्यथा मंत्रिपदाचा राजीनामा द्या, अशा घोषणा देत सोमवारी दुपारी मन्यारखेडा (ता. जि. जळगाव) येथील आदिवासी बांधवांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात धोंडी धोंडी पाणी द्या म्हणत, हंडा मोर्चा काढत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर रोष व्यक्त केला. आंदोलनस्थळी जिल्हाधिकारी येत नाहीत, तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलक ग्रामस्थांनी केला. अखेर पोलिसांकडून आंदोलकांना पोलीस वाहनात टाकून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. नोटीस बजावून नंतर सोडून दिले.
पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात येत असलेल्या व जळगाव शहरापासून अवघ्या आठ किलोमीटवरील मन्यारखेडा येथील आदिवासी बांधव गेल्या बारा वर्षांपासून पाणी, वीज, रस्ते आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. तलावाकाठी केलेल्या झर्यातून हंड्याने पाणी आणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. निवडणुकीवेळी सर्वच येतात. आश्वासने दिली जातात. मात्र, पाच वर्षे आमच्याकडे बघतही नाहीत, असा संतापही आंदोलकांनी व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाला मूलभूत सुविधा न पुरविल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, निवेदनाची दखल न घेतल्याने सोमवारी पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित व विधी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम यांनी सांगितले.
हेही वाचा… खरी शिवसेना कोणाची हे जनताच ठरवेल, छगन भुजबळ यांचे प्रतिपादन
आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित व विधी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर, शहर उपाध्यक्ष आशिष सपकाळे, रत्नाकर अहिरे, महेश माळी यांनी केले. आंदोलनात जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, ललित शर्मा, महानगर संघटक प्रशांत बाविस्कर, किरण सपकाळेे आदींसह मन्यारखेडा गावातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनात महिलांचा लक्षणीय सहभाग होता.
हेही वाचा… नाफेडमार्फत पैसे न मिळाल्याने कांदा उत्पादकांमध्ये नाराजी
गुलाबभाऊ पाणी द्या; अन्यथा मंत्रिपदाचा राजीनामा द्या, धोंड्या धोंड्या पाणी द्या… गुलाबभाऊ पाणी द्या… अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला होता. आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करीत रस्ता मोकळा करण्याची सूचना केली. जिल्हाधिकारी जोपर्यंत आंदोलनस्थळी येत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू ठेवू, अशी ठाम भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांनी ताब्यात घेत जिल्हापेठ पोलीस नेण्यात आले. यानंतर नोटीस बजावून त्यांना सोडण्यात आले.
हेही वाचा… नाशिक : अपघातात टँकर चालकाचा मृत्यू
निवेदनात म्हटले आहे की, मन्यारखेडा गावात बहुतेक आदिवासी समाजबांधवांचे वास्तव्य असून, ते गेल्या बारा वर्षांपासून राहत आहेत. सद्यःस्थितीत आदिवासी बांधव विविध मूलभूत सेवा-सुविधांपासून वंचित आहेत. गावात विकासाच्या नावाची बोंबाबोंब दिसून येते. पाणीप्रश्न चांगलाच भेडसावत आहे. पाण्यासाठी आदिवासी बांधवांना भटकंती करावी लागत आहे. वर्षानुवर्षांपासून हीच स्थिती आहे. गावात पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय नाही. वीजखांबही नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षांपासून आदिवासी बांधव अंधारात राहत आहेत. गावात रस्तेही नाहीत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत ग्रामस्थांना कसरत करावी लागते.
एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असून, मात्र मन्यारखेडा गाव जळगावपासून अवघ्या आठ किलोमीटरवर असूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. पाणीपुरवठामंत्र्यांच्या मतदारसंघातील गावात पाणी मिळत नसेल, तर राज्यातील उर्वरित गावांचे काय? गावातील वीज, पाणी, रस्ते आदी मूलभूत सुविधा पाच दिवसांच्या आत न पुरविल्यास मनसे स्टाइलने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.