दीपावलीच्या पाश्र्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी बनावट मिठाईची निर्मिती व विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर सोमवारी मनसे पदाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह दिंडोरी रोड आणि मखमलाबाद रोड येथील मिठाईच्या दुकानांवर छापा टाकला.
या वेळी विनापरवाना भट्टी चालविण्यात येत असल्याचे उघड झाले.
दिंडोरी रोडवरील मधुर स्वीट तसेच मखमलाबाद रोडवरील गणेश स्वीट या दुकानांवर निकृष्ट मिठाई व खवा तयार करण्यात येत असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी उमेश कुंभोजकर, भरत इंगळे यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांनी छापा टाकला. या वेळी पालिकेच्या अग्निशमन दलाची परवानगी न घेता भट्टय़ा चालविल्या जात असल्याचे दिसून आले. यासंदर्भात आयुक्तांना पत्राद्वारे कळविण्यात येणार असल्याची माहिती मनसे विद्यार्थी आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संदीप भवर, मनसेचे शहर सरचिटणीस मनोज घोडके यांनी दिली. या वेळी ललित ओहोळ, सौरभ सोनवणे, गणेश मंडलिक, दीपक निकम, आदी उपस्थित होते.

Story img Loader