वेगवेगळ्या अपघातात बालिकेसह दोघांचा मृत्यू, तीन जखमी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नाशिक : नव्या वर्षांचे स्वागत मद्यपानाने करण्याची काही वर्षांत रुजलेली परंपरा यंदाही सुरू राहिली. वर्षांच्या शेवटच्या रात्रभर धांगडधिंगा करणारे, मद्यप्राशन करून सुसाट वाहने चालविणारे, एका दुचाकींवरून तीन किंवा चार जण जाणारे वाहनधारक पोलिसांच्या कचाटय़ात सापडले. पोलिसांनी ठिकठिकाणी राबविलेल्या तपासणी मोहिमेतंर्गत शेकडो वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात मद्यपान करून वाहन चालविणारे १५० हून अधिक चालक पोलिसांच्या तावडीत सापडले. याच दिवशी अपघातही घडले. गंगापूर गावापासून सुला वाईनकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री रिक्षा कारवर धडकून झालेल्या अपघातात बालिका ठार, तर दोन जण जखमी झाले. विहितगाव येथील वीटभट्टी रस्त्यावर मोटारसायकल अपघातात चालक ठार झाला.
काही वर्षांपासून ‘थर्टी फर्स्ट’ला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. तळीरामांसाठी हा खास दिवस. मद्यपानाद्वारे नवीन वर्षांचे स्वागत करताना मद्यपींकडून घातला जाणारा गोंधळ सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. खुलेआम मद्यपान करणे, जोरात दुचाकी दामटणे, रस्त्यावर आरडाओरड करत गोंधळ घालणे, कर्णकर्कश आवाजात गाणे वाजवत धिंगाणा घालणे याद्वारे शहराच्या एकूणच शांततेला सुरुंग लावण्याचे काम संबंधितांकडून केले जाते. हा अनुभव लक्षात घेऊन शहर पोलीस सक्रिय झाले होते. शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या मार्गावरील मुख्य चौक, संवेदनशील परिसरात नाकाबंदी आणि प्रमुख चौकात बंदोबस्त तैनात करण्यात आला. प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह मुख्यालयातून ३०० अतिरिक्त कर्मचारी, राज्य राखीव दलाची तुकडी, शीघ्र कृती दलाची पथके रस्त्यावर उतरली होती. प्रमुख रस्त्यांवर लोखंडी अडथळे उभारून वाहन तपासणीची धडक मोहीम राबवून मद्यपींवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कॉलेजरोड हा महाविद्यालयीन युवकांसाठी आवडता रस्ता. सोमवारी रात्री मोटारसायकल, चारचाकी अशा वाहनांद्वारे युवकांचे जत्थे परिसरात भ्रमंती करीत होते. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुल्लडबाजी करणारे, मद्यपान करून वाहन दामटविणारे, धांगडधिंगा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत शेकडो वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात वाहनांची कागदपत्रे न बाळगणारे, मद्यपान करणारे, क्षमतेहून जादा प्रवाशांची वाहतूक, गोंधळ घालणे आदी वेगवेगळ्या कारणास्तव वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. दारुबंदी विभागाच्या परवानगीशिवाय मद्य पिणे, मद्य बाळगणे गुन्हा आहे. संबंधितांवर कारवाई करून त्यांची प्रकरणे न्यायालयासमोर सादर केली जाणार असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.
अपघातांचे सत्र
नववर्षांच्या स्वागताचा जल्लोष सुरू असताना याच दिवशी वेगवेगळ्या अपघातात बालिकेसह दोन ठार तर तीन जण जखमी झाले. पहिला अपघात रात्री १० वाजता गंगापूरकडून सुला वाईनकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाला. भरधाव रिक्षा उलटून मोटारीवर धडकली. अपघातात रिक्षातील राखी राजेश चौधरी (सहा) ही बालिका ठार झाली, तर राजेश चौधरी (४२), ऋतिक चौधरी (अडीच वर्ष) हे जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची तब्येत स्थिर आहे. या संदर्भात सारिका आहेर यांनी तक्रार दिली. या प्रकरणी हलगर्जीपणे रिक्षा चालवून बालिकेचा मृत्यू आणि दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्यावरून चालक विठ्ठल पाटील (जेलरोड) याच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा अपघात विहितगाव येथील वीटभट्टी रस्त्यावर झाला. भरधाव दुचाकी खड्डय़ात जाऊन विकी राजपूत (३०) या युवकाचा मृत्यू झाला. संबंधित युवक मद्यसेवन करून वाहन चालवित असल्याचा संशय आहे. लहवितच्या मालवाडी येथे राहणारा विकी रात्री साडेआठच्या सुमारास घराबाहेर पडला. मोटारसायकलवरून रोकडोबा वाडीलगतच्या वीटभट्टी परिसरातून जात असताना नियंत्रण सुटून मोटारसायकल चारीत गेली. सकाळी ही घटना स्थानिकांच्या लक्षात आली. राजपूतचा मित्र संदीप घोषने धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु तत्पूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. भरधाव गाडी चालवून स्वत:च्या मरणास कारणीभूत ठरल्या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजून एका घटनेत कॉलेज रोडवर भरधाव मारुती मोटारीने मोटारसायकलला धडक दिल्याने भूषण वैशंपायन (३६) हा युवक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर मोटार चालकाने पळ काढला. अपघातात भूषणच्या डोक्याला गंभीर मार लागला. संबंधिताने हेल्मेट परिधान केले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलिसांकडून ८८ जणांविरुद्ध कारवाई
सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांचे स्वागत करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८८ वाहन चालकांविरुद्ध जिल्हा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. जिल्ह्य़ात ४० पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महामार्ग आणि रस्ते परिसरात गस्त वाढविण्यात आली होती. महिलांची छेडछाड रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस आणि दामिनी पथक तैनात करण्यात आले होते. सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा वाहतूक शाखा आणि शहर वाहतूक शाखा मालेगाव अशा पथकांनी ८८ वाहनधारकांविरुद्ध गुन्हे दाखल करून १७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. तसेच अवैधरीत्या मद्य विक्री आणि वाहतूक करणाऱ्या १५ जणांविरुद्ध कारवाई करून दारुबंदी कायद्यान्वये १३ प्रकरणे दाखल करण्यात आली. त्यात ७४ हजार ४४८ किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. आठ जुगाऱ्यांकडून ६३,०१० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.