लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : केंद्र तसेच राज्य सरकारचे सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना सेवानिवृत्ती वेतनासाठी हयातीचा दाखला देणे अनिवार्य असते. हे दाखले जमा करताना ज्येष्ठ नागरिकांची परवड होत असल्याने टपाल विभागाच्या वतीने डिजिटल लाईफ सटिर्फिकेट (डीएलसी) ही योजना सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठांना घरबसल्या यासंदर्भातील दाखला मिळत असून जिल्ह्यातील १७०० हून अधिक सेवानिवृत्तांनी लाभ घेतला आहे.

Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
governor scam marathi news
नाशिकच्या ठकबाजाकडून नागपुरात गोशाळा उभारण्यासाठी तीन कोटी
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
number of ST bus accidents increased in Nashik division
नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू
Wildfire at foot of Sula mountain Environmentalists and farmers control on fire
सुळा डोंगर पायथ्याला वणवा; पर्यावरणमित्र, शेतकऱ्यांकडून नियंत्रण
Stampede at Bandra Station
Bandra Stampede : “स्पेशल ट्रेनला १६ तास उशीर, एक्स्प्रेस फलाटावर येताच…”, पोलिसांनी सांगितला वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीचा घटनाक्रम!

सेवानिवृत्तीवेतन पात्र ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असते. हा दाखला मिळवण्यासाठी ज्येष्ठांची परवड होते. टपाल विभागाने पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून सेवानिवृत्ती धारकांना ‘डीएलसी ॲट डोअरस्टेप’ मोहिमेद्वारे त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्रे सादर करण्यास मदत केली आहे. याविषयी विभागीय टपाल अधिकारी विठ्ठल पोटे यांनी माहिती दिली. या योजनेमुळे सेवानिवृत्तीवेतन धारकांना वेळेत सेवानिवृत्ती वेतन मिळण्यास मदत मिळणार आहे. या माध्यमातून आयपीपीबँकद्वारे सर्व टपाल कार्यालयातून प्रमाणपत्र तयार केले जातात. त्यासाठी नाममात्र ७० रुपये शुल्क आहे. पोस्टमन घरी येतात. त्यांच्या जवळील डिजिटल उपकरणांच्या मदतीने बायोमॅट्रिक पध्दतीनेत अवघ्या काही मिनिटात प्रमाणपत्र देतात, असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू

सद्यस्थितीत नाशिक शहर तसेच जिल्ह्यातून १८०० हून अधिक ज्येष्ठांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. यामुळे ज्येष्ठांना बँकेत जाऊन प्रमाणपत्र मिळविण्यातून मुक्तता मिळत असून ज्येष्ठ नागरीकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Story img Loader