लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : जुने नाशिक परिसरातील चौक मंडई येथे सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत ४० ते ५० वाहने खाक झाली. कुठलीही जिवीतहानी झाली नाही. चौक मंडई हा वर्दळीचा परिसर आहे. या ठिकाणी चप्पल, बूट गोदाम आणि अनेक वस्तूंच्या सुट्या भागांची दुकाने आहेत. सोमवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास एका ई वाहनाला आग लागली. आग पसरत गेली. आगीच्या विळख्यात ५० ते ६० वाहने खाक झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.

आणखी वाचा-नाशिकच्या जागेवर भाजपचा पुन्हा दावा

वाहन बाजार आणि गोदामच्या मागील बाजूस असलेली तीन घरेही जळाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शिंगाडा तलाव मुख्यालयासह सिडको, सातपूर, नाशिक रोड, पंचवटी येथील अग्निशमन बंबांनी दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. दुकान परिसरात लागलेली आग वस्तीकडे येत असल्याचे पाहून लोकांची धावपळ उडाली. लोकांची गर्दी आणि निमुळते रस्ते, यामुळे अग्निशमन बंबाला मदतकार्य करताना अडचणी आल्या. बघ्यांची गर्दीही मदतकार्यात अडथळा ठरली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 40 vehicles destroyed in chowk mandai fire mrj