दसऱ्याचा मुहूर्त साधत सुवर्णनगरीत कोट्यवधींची उलाढाल झाली. जिल्ह्यात सुमारे ५० किलो सोन्याची विक्री झाली. धवारी (५ऑक्टोबर) सोन्याचा प्रतितोळा दर ५२ हजारांपर्यंत, तर चांदीचा प्रतिकिलो दर ६२हजारांपर्यंत होता. जिल्ह्यात सुमारे पन्नास किलो सोन्याची विक्री झाल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा >>>सीएनजी दरवाढी विरोधात राष्ट्र्वादी युवक काँग्रेसचे काळे सोने वाटून आंदोलन

जळगावचा सुवर्ण बाजार देशभरात प्रसिद्ध आहे. येथील सोन्याची शुद्धता आणि व्यवहारातील विश्वासार्हता यामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, दक्षिण भारतातून सातत्याने सोन्याचे चोखंदळ ग्राहक जळगावात येतात. काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू होते. गेल्या आठवड्यात सोन्याचा प्रतितोळा दर ५१ हजारांच्या खाली, तर चांदीचा प्रतिकिलो दर ५७ ते ५८ हजारांपर्यंत होते. दसऱ्यानिमित्त दरात मोठी वाढ झाली. सोने प्रतितोळा ५२ हजारांवर गेले, तर चांदी प्रतिकिलो ६२ हजारांवर गेली. एकाच दिवसात २४ कॅरेट सोन्याच्या दरात ७०० रुपयांहून अधिक तर, चांदीच्या प्रतिकिलो दरात चार-साडेचार हजारांपर्यंत वाढ झाली.

हेही वाचा >>>Dasara Melava 2022: विचित्र हातवारे करणाऱ्या शिंदे गटातील समर्थकांना ठाकरे गटातील महिलांचा चोप

यंदा पितृपक्षापासून सोने खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. दसऱ्याचा मुहूर्त साधत गतवर्षापेक्षा दीडपट अर्थात ५० किलो सोने विक्री झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गतवर्षी विजयादशमीला सोन्याची ३५ किलोपेक्षा अधिक विक्री झाली होती.
दसऱ्याच्या मुहूर्तावर विविध प्रकारचे व आकर्षक सोन्या-चांदीचे दागिने दालनात उपलब्ध करून देण्यात आले होते. यंदा सोने खरेदीला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरातून सोने खरेदीसाठी ग्राहक आले होते.- मनोहर पाटील (सरव्यवस्थापक, आर. सी. बाफना ज्वेलर्स, जळगाव)
दसऱ्यानिमित्त ठुशी, चंदनहार, शाहीहार, टेम्पल ज्वेलरी, राणीहार, चिंचपेटी, कोल्हापुरी साज, बोरमाळ, पुतळी हार, पुतळी चपला हार, चंदनहार, शाहीहार, कोल्हापुरी साज, बोरमाळ, पुतळी हार, पुतळी चपला हार यांसह विविध आकर्षक दागिने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सोने खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.- कपिल खोंडे (खोंडे ज्वेलर्स, जळगाव)

Story img Loader